नवी दिल्ली: भारत-चीन सीमेवरील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. सीमाभागात असलेल्या उत्तर पेंगॉंगमध्ये चीनने जवळपास 6 किलोमीटर आत घुसखोरी केल्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भातील एक अहवाल इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस म्हणजेच आयटीबीपीने भारतीय गृह मंत्रालयाकडे सोमवारी पाठविला आहे. आयटीबीपीच्या अहवालानुसार, येथील उत्तर पेंगाँग तलावाजवळच्या परिसरात चिनी सैन्याने गाड्यांच्या माध्यमातून 28 फेब्रुवारी, 7 मार्च आणि 12 मार्च 2018 या तीन दिवशी घुसखोरी केली. मात्र, आयटीबीपीच्या जवानांनी विरोध केल्यानंतर चिनी सैन्य माघारी परतले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात चिनी सैनिकांनी याच परिसरात भारतीय सुरक्षा रक्षकांवार दगडफेक केली होती. दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील असाफिलामध्ये भारताने आक्रमण केल्याचे चीनने बीपीएमच्या बैठकीत म्हटले होते. यावेळी ‘आक्रमण’ शब्दाला भारताने आक्षेप घेतला होता. गेल्या वर्षी सिक्कीम सेक्टरच्या डोकलाममधील रस्ते बांधणीवरुन भारत आणि चीनमध्ये जवळपास 73 दिवस तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी भारताच्या सामंजस्य भूमिकेमुळे डोकलाम वाद सुटला होता.
चीनची घुसखोरी, भारताची सीमा ओलांडून चीनी सैन्य 6 किमीपर्यंत आत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 15:47 IST
भारत-चीन सीमेवरील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. सीमाभागात असलेल्या उत्तर पेंगॉंगमध्ये चीनने जवळपास 6 किलोमीटर आत घुसखोरी केल्याचे सांगण्यात आले आहे.
चीनची घुसखोरी, भारताची सीमा ओलांडून चीनी सैन्य 6 किमीपर्यंत आत
ठळक मुद्देभारताची सीमा ओलांडून चीनी सैन्य 6 किमीपर्यंत आतआयटीबीपीने भारतीय गृह मंत्रालयाकडे अहवाल