रशिया, अमेरिकेनंतरचा तिसरा देश : अंतराळ कार्यक्रमात ड्रॅगनचे आणखी एक पाऊल पुढे, यान पृथ्वीवर उतरले
बीजिंग : चीनने आज चंद्रावरून परतीचे आपले पहिले मिशन यशस्वीरीत्या पूर्ण केले. चीनचे मानवरहित यान पृथ्वीवर परतले. या यशामुळे चीन तत्कालीन सोव्हिएत संघ आणि अमेरिका यांच्यानंतर अशा प्रकारची मोहीम यशस्वीरीत्या पार करणा:या देशांत सामील झाला आहे. दरम्यान, या यशस्वी चाचणीमुळे यानाने आणलेले नमुने व माहितीचा आगामी मोहिमांसाठी चीनला मोठा उपयोग होईल, असा विश्वास चीन सरकारने व्यक्त केला आहे.
रशियाच्या नेतृत्वाखालील सोव्हिएत संघ व अमेरिका यांनी सुमारे 4क् वर्षापूर्वीच ही मोहीम यशस्वीरीत्या पार केली आहे. या अभियानामुळे चीन आपल्या महत्त्वाकांक्षी अंतराळ कार्यक्रमात आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. चंद्राच्या कक्षेत जवळपास एक आठवडय़ापूर्वी पाठविण्यात आलेले हे चिनी यान शनिवारी सकाळी देशाचा एक भाग असलेल्या मंगोलियाच्या स्वायत्त क्षेत्रत उतरले.
चंद्राच्या कक्षेत पाठवून व धरतीवर परतण्याची त्याची क्षमता जाणून घेण्यासाठी चीनने हे यान एक आठवडय़ापूर्वी प्रक्षेपित केले होते. चंद्राच्या कक्षेत फिरणो, उतरणो आणि अखेरीस पृथ्वीवर परतणो या तीन टप्प्यांतील चिनी चांद्रयान मोहिमेसाठी ही महत्त्वाची प्रायोगिक चाचणी होती.
चिनी वृत्तसंस्था शिन्हुआच्या मते, राजधानी बीजिंगपासून सुमारे 5क्क् किलोमीटर अंतरावरील प्रक्षेपण तळावर हे यान उतरले. यापूर्वी सोव्हिएत संघाने 197क् च्या दशकात अशा प्रकारची मोहीम हाती घेतली होती. गेल्या आठवडय़ात शुक्रवारी हे यान प्रक्षेपित करण्यात आले होते. आपल्या आठ दिवसांच्या अभियानात यानाने आठ लाख 4क् हजार किलोमीटरचे अंतर कापले आणि पृथ्वी व चंद्राचे एक दिमाखदार छायाचित्र टिपले. (वृत्तसंस्था)
च्पृथ्वीवर परतण्याची प्रक्रिया स्थानिक वेळेनुसार, सकाळी 6 वाजून 13 मिनिटांना सुरू झाली. यान जवळपास 11.2 किलोमीटर प्रतिसेकंद वेगाने पृथ्वीवर परतले. चीनने आपल्या पहिल्या (भावी) मिशन चांग-5 च्या प्रक्षेपण तंत्रज्ञान चाचणीसाठी 24 ऑक्टोबरला हे मानवरहित अंतराळ यान प्रक्षेपित केले होते.
च्चीनच्या दक्षिण- पश्चिमेकडील सिचुआन प्रांततील शीचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरील अत्याधुनिक ‘लाँग मार्च-3 सी’ रॉकेटच्या माध्यमातून प्रक्षेपित केले होते. या यानात वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा चांग-5 मोहिमेसाठी उपयोग करण्यात येणार आहे. चांग-5 चंद्रावर पाठविले जाईल आणि ते 2क्17 मध्ये पृथ्वीवर येईल. यापूर्वी चीनने 2क्क्7 मध्ये चांग-1, 2क्1क् मध्ये चांग-2 आणि डिसेंबर 2क्13 मध्ये चांग-3 हे यान चंद्रावर पाठविले आहेत.