शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

कोको बेटावरून चीनची पाळत, भारताला धाेका; ड्रॅगनची तिरकी चाल, धावपट्टीही बांधली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 06:48 IST

पूर्व लडाखच्या मुद्द्यावरून भारत व चीनमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच आता चीनने नवी खेळी केली आहे.

नवी दिल्ली :

पूर्व लडाखच्या मुद्द्यावरून भारत व चीनमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच आता चीनने नवी खेळी केली आहे. बंगालच्या खाडीमधील अंदमान बेटांपासून अवघ्या साठ किमी अंतरावर असलेल्या म्यानमारमधील कोको बेटावरून भारतावर नजर ठेवण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या आहेत. कोको बेटावर चीनने विमानासाठी धावपट्टी बांधली आहे. हेरगिरी करण्यासाठी तिथे चीनकडून उपकरणे बसविण्यात येत असल्याचे वृत्त आहे. चीनच्या या हालचालींवर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. 

कोको बेटावरून चीनला भारताच्या पूर्व किनारपट्टीवर, तसेच हिंद महासागराच्या मोठ्या प्रदेशावर पाळत ठेवता येईल. याच भागात भारताचे क्षेपणास्त्र चाचणी केंद्र आहे. इथे होणाऱ्या क्षेपणास्त्र चाचण्यांची माहिती त्वरित मिळविण्यासाठी चीनकडून प्रयत्न सुरू असतात. चीनच्या वाढलेल्या हालचालींची माहिती भारताने म्यानमार सरकारला दिली आहेत. मात्र, म्यानमार सरकारने याचा इन्कार केला आहे. (वृत्तसंस्था)

लंकेमध्येही आता चीनचा रडार तळचीन आता श्रीलंकेतील डोंडरा बे येथील जंगलक्षेत्रात रडार तळ उभारत असल्याचे वृत्त आहे. हिंद महासागरातील भारताच्या हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी या रडार यंत्रणेचा उपयोग केला जाईल. डोंडरा बे येथील रडार यंत्रणेद्वारे दक्षिण भारतातील सर्व प्रदेश, तेथील कुडनकुलम, कलपक्कम अणुऊर्जा प्रकल्प, श्रीहरिकोटा येथील स्पेस स्टेशन, अंदमान-निकोबार बेट यावर चीनला  नजर ठेवता येईल. 

‘भारत सुरक्षेसाठी पावले उचलणार’1. कोको बेटावरील चीनच्या हालचाली पाहता भारत आपल्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलेल, असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी नुकतेच सांगितले होते. 2. याबद्दल म्यानमारमधील चीनच्या राजदुताने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. म्यानमारने चीनला कोको बेटावर हेरगिरीसाठी उपकरणे उभारण्याची १९९० साली परवानगी दिली होती. 

चीन सीमेजवळील गावाला गृहमंत्री शाह देणार भेट- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १० आणि ११ एप्रिल रोजी अरुणाचल प्रदेशला भेट देणार असून, त्यादरम्यान ते भारत-चीन सीमेवरील किबिथू या गावात ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम’ची सुरुवात करतील. - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२२-२३ ते २०२५-२६ साठी विशेषत: रस्तेजोडणीसाठी २५०० कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली आहे. - ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रॅम’अंतर्गत ४८०० कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे.ही केंद्र सरकारपुरस्कृत योजना आहे. सीमावर्ती गावांमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवनमान सुधारण्यास यामुळे मदत होणार आहे. -  चीनने अरुणाचलातील काही गावांचे नाव बदलण्याची कुरापत केली हाेती. त्या पार्श्वभूमीवर शाह यांची भेट महत्त्वाची मानली जाते.

टॅग्स :chinaचीन