शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या कुरापती सुरुच, हिंद महासागरात पाठवले गुप्तहेर जहाज; यामागे असू शकतो 'हा' उद्देश...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 10:55 IST

Chinese Spy Ship : भारतीय नौदलाला  (Indian Navy) याबाबत सतर्क करण्यात आले आहे. यामागे चीनचा हेतू काय आहे, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

चीनच्या (China) कुरापती दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत आहे. चीन आपल्या शेजारी असलेल्या देशांवर बारीक नजर ठेवतो आणि वेळोवेळी कारवाई करत असतो. यावेळी चीनने आपले एक गुप्तहेर जहाज (Spy Ship) हिंद महासागरात (Indian Ocian) पाठवले आहे. भारतावर नजर ठेवण्यासाठी चीनने हे गुप्तहेर जहाज हिंदी महासागरात पाठवले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भारतीय नौदलाला  (Indian Navy) याबाबत सतर्क करण्यात आले आहे. यामागे चीनचा हेतू काय आहे, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय नौदल चीनच्या हेरगिरी जहाजावर लक्ष ठेवून आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे जहाज हिंदी महासागरात असले तरी ते भारताच्या सागरी सीमेपासून दूर आहे. असे असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय नौदलाचे अनमँड एरियल व्हेईकल (Unmanned Aerial Vehicle) चीनच्या हेरगिरी जहाजावर सतत लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, आपल्या शेजारी असलेल्या देशांवर लक्ष ठेवण्यासाठी चीनने यापूर्वीही अशी कृत्ये केली आहेत. याशिवाय, उपग्रह प्रक्षेपणावर लक्ष ठेवण्यासाठी चीनही अशी जहाजे पाठवत असतो. मात्र, यावेळी चीनकडून हे जहाज हिंदी महासागरात पाठवण्यामागचा उद्देश कळू शकलेला नाही. विशेष म्हणजे, भारताचे हिंदी महासागराशी मजबूत आर्थिक, राजकीय आणि सामाजिक संबंध आहेत. भारताची आयात-निर्यात मोठ्या प्रमाणात या हिंदी महासागरातूनच होते. पण भारतासह इतर देशांनी हिंदी महासागरातून व्यापार करणे चीनला आवडत नाही. हिंदी महासागरातून मुक्त व्यापाराला चीनचा विरोध आहे.

याचबरोबर भारत, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसह अनेक देश हिंदी महासागरात मुक्त व्यापाराच्या बाजूने आहेत. रशिया आणि चीनने अंटार्क्टिकाभोवतीच्या तीन विशाल महासागरांचे अतिमासेमारीपासून संरक्षण करण्यासाठी युरोपियन युनियन, अमेरिका आणि इतर 23 देशांनी समर्थित योजना पुन्हा थांबवल्या आहेत. रशियाची क्षमता आणि चीनच्या हस्तक्षेपामुळे अनेक देशांना समस्या निर्माण होत आहे. कारण कधी-कधी दोघेही एकमत होण्यापूर्वी व्हीटो करतात.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतindian navyभारतीय नौदल