शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चीनमधील नवीन आजाराने भारताचं वाढलं टेन्शन?, 6 राज्यांना अलर्ट, लोकांना दिला 'हा' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 16:09 IST

चीनमधील मुलांमध्ये न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यांतील रुग्णालये, आरोग्य कर्मचाऱ्यांना श्वसनाच्या समस्या असलेल्या रुग्णांना तातडीने हाताळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चीनमधील मुलांमध्ये वेगाने वाढणाऱ्या श्वसनाच्या आजारामुळे भारत सरकारने 6 राज्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये राजस्थान, कर्नाटक, गुजरात, उत्तराखंड, तामिळनाडू आणि हरियाणा यांचा समावेश आहे. चीनमधील मुलांमध्ये न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या राज्यांतील रुग्णालये आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना श्वसनाच्या समस्या असलेल्या रुग्णांना तातडीने हाताळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कर्नाटक सरकारने आपल्या राज्यातील लोकांना फ्लूबद्दल जागरुक राहण्यास सांगितलं आहे. 

लोकांना खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे, वारंवार हात धुवा, चेहऱ्याला स्पर्श करणं टाळा आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला. स्थानिक रिपोर्ट म्हटलं आहे की, राजस्थान आरोग्य विभागाने दिलेल्या सल्ल्यात म्हटलं आहे की परिस्थिती सध्या चिंताजनक नाही. परंतु वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे आणि संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखला पाहिजे. बालरोग विभाग आणि वैद्यकीय विभागांमध्ये पुरेशी व्यवस्था करण्यात यावी, असे राजस्थानने म्हटले आहे.

गुजरात, उत्तराखंडमध्ये आरोग्य विभागाचा इशारा

गुजरातचे आरोग्य मंत्री हृषिकेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील परिस्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून कोविड-19 महामारीच्या काळात तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेवा-सुविधा मजबूत केल्या जात आहेत. सरकारने अधिकाऱ्यांना त्यांच्या तयारीचा आढावा घेण्यास सांगितले आहे. त्याच वेळी, उत्तराखंडच्या आरोग्य अधिकार्‍यांना श्वसनाच्या आजारांच्या प्रकरणांवर देखरेख वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण उत्तराखंडमधील चमोली, उत्तरकाशी आणि पिथौरागड हे तीन जिल्हे चीनच्या सीमेला लागून आहेत. 

तमिळनाडू देखील पावलं उचलत आहे. तसेच सरकारी आणि खासगी रुग्णालयांनाही तसे आदेश दिले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या निवेदनात म्हटले आहे की राज्यात आतापर्यंत मुलांमध्ये न्यूमोनियाची एकही घटना आढळली नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून अधिकाऱ्यांना जागरुक राहण्यास सांगण्यात आले आहे. केंद्राने 24 नोव्हेंबर रोजी सांगितले की चीनमधील सध्याच्या इन्फ्लूएंझा परिस्थितीमुळे उद्भवलेल्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी भारत तयार आहे आणि H9N2 उद्रेक आणि त्या देशातील मुलांमधील श्वसन आजाराच्या प्रकरणांवर लक्ष ठेवत आहे. 

टॅग्स :Indiaभारतchinaचीन