शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

Sri Lanka India News: भारतानं श्रीलंकेत चीनचा केला 'गेम ओव्हर' अन् म्यानमारमध्येही अमेरिकेचा डाव उधळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 16:35 IST

हिंदी महासागरात आपले वर्चस्व वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनला भारतानं मोठा धक्का दिला आहे. श्रीलंकेला कर्जाच्या सापळ्यात अडकवण्याचा डाव उघडकीस आल्यानंतर भारतानं चीनवर सामरिक आघाडी प्राप्त केली आहे.

नवी दिल्ली- 

हिंदी महासागरात आपले वर्चस्व वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनला भारतानं मोठा धक्का दिला आहे. श्रीलंकेला कर्जाच्या सापळ्यात अडकवण्याचा डाव उघडकीस आल्यानंतर भारतानं चीनवर सामरिक आघाडी प्राप्त केली आहे. भारतानं उत्तर श्रीलंकन ​​बेटांमध्ये वीज प्रकल्प उभारण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या उपस्थितीत यासंबंधीचा करार करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे गेल्या वर्षी श्रीलंकेच्या मंत्रिमंडळानं यासाठी चीनी कंपनीसोबतच्या कराराला मंजुरी दिली होती. आता हाच प्रकल्प चीनकडून हिसकावून भारताच्या ताब्यात देण्यात आला आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था बिकट असताना जयशंकर यांनी श्रीलंकेचा दौरा केला आहे. श्रीलंकेवरील कर्जाचा बोजा वाढला आहे, परकीय चलनाची गंगाजळी रिकामी झाली आहे आणि सरकारविरोधातील आंदोलनं तीव्र झाली आहेत. श्रीलंकेच्या आजच्या परिस्थितीसाठी चीनला जबाबदार धरलं जात आहे. याच परफेक्ट टायमिंग साधत भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी पुढे आला आहे. 

दुसरीकडे, म्यानमारला एकाकी पाडण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांमध्ये भारत सामील होताना दिसत नाही. अमेरिकेचा विरोध असतानाही म्यानमारने बिमस्टेक परिषदेत भाग घेतला. पंतप्रधान मोदींनी शेजारी देशांना एका ओळीत मोठा संदेश दिला आहे. युरोपचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, तेथील परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय अस्थिरतेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, असं विधान केलं. चीनच्या कारवायांविरोधात एकजूट राहण्याचा अप्रत्यक्ष इशाराच पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला आहे. 

श्रीलंकेत चीनचा खेळ संपला!जाफना किनार्‍यावरील नैनातिवू, डेल्फ किंवा नेदुंतिवू आणि अनालायतिवू येथे हायब्रीड अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी जानेवारी २०२१ मध्ये चीनी कंपनी सिनोसार-टेकविनसोबत श्रीलंकेनं करार केला होता. यावर भारताने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर श्रीलंकेत पुन्हा यावर मंथन सुरू झालं होतं. वास्तविक, ही तिन्ही ठिकाणं तामिळनाडूच्या जवळ आहेत आणि चीननं आपलं अस्तित्व वाढवावं असं भारताला वाटत नाही. आता भारत आणि श्रीलंका यांच्यात जाफनामध्ये तीन पॉवर प्लांट प्रकल्प सुरू करण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्यानं चीनला मोठा धक्का मानला जात आहे. भारतानं प्रकल्पांच्या स्थानाबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर, चीननं गेल्या वर्षी "थर्ड पार्टी" सुरक्षेच्या कारणास्तव हायब्रीड पॉवर प्लांट उभारण्याचा प्रकल्प रद्द केला होता.

भारतीय दूतावासाकडूनही श्रीलंकेसोबतच्या कराराबात एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. "परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री जी. आले. पेइरिस यांनी सोमवारी यासंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन (बिमस्टेक) परिषदेत सहभागी होण्यासाठी जयशंकर कोलंबोमध्ये आहेत. श्रीलंकेत औषध, इंधन आणि दूध यांचा तुटवडा आणि अनेक तास वीज खंडित होत आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेसोबत ऊर्जा क्षेत्रात करार करण्यात आला आहे. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी भारत श्रीलंकेला मदत करेल", असे जयशंकर यांनी म्हटले आहे. दुसरीकडे कर्जाच्या जाळ्यात अडकवून हा प्रकल्प बळकावण्याचा चीनचा मनसुबा आहे.

चीनचं कर्ज न फेडल्यामुळे श्रीलंकेला हंबनटोटा बंदर एका चिनी कंपनीला ९९ वर्षांसाठी भाड्यानं द्यावं लागलं. जगभरातील देशांनी श्रीलंकेला इशारा दिल्यानं चीनबाबत देशात नाराजीही वाढली आहे. सध्याच्या आर्थिक संकटासाठी लोक श्रीलंका सरकारच्या चीनशी असलेल्या जवळीकीला जबाबदार धरत आहेत. 

आता चीनचं अजिबात चालणार नाही!श्रीलंकेत चीनचा 'गेम ओव्हर' झाल्यानंतर भारताचं शेजारी देशांशी संबंध मजबूत करण्याकडे लक्ष आहे. "प्रादेशिक सहकार्य आणखी वाढवणं महत्त्वाचं झालं आहे. BIMSTEC देशांमधील परस्पर व्यापार वाढवण्यासाठी BIMSTEC FTA प्रस्तावावर पुढं जाणं आवश्यक बनलं आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वर्षांच्या कोरोना कालावधीचा संदर्भ देत बिमस्टेक शिखर परिषदेत म्हणाले. "आपला प्रदेश आरोग्य आणि आर्थिक सुरक्षेच्या आव्हानांना तोंड देत असल्यानं एकता आणि सहकार्य ही काळाची गरज आहे", असंही ते म्हणाले. भारताव्यतिरिक्त BIMSTEC सदस्य देशांमध्ये श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, नेपाळ आणि भूतान यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमारमध्ये चीन आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

भारत म्यानमारच्या विरोधात जाणार नाहीम्यानमारच्या लष्करी राजवटीविरोधात अमेरिका कठोर भूमिका घेत आहे. अनेक निर्बंध लादण्याबरोबरच देशाला जागतिक पातळीवर एकाकी पाडण्याच अमेरिकेडा डाव आहे. त्यांनी आपली भूमिकाही भारताला कळवली. पण भारत पाश्चात्य देशांच्या प्रयत्नांमध्ये सामील होण्यास इच्छुक नाही. भारताने स्पष्टपणे सांगितलं आहे की, म्यानमारचे धोरण सुरक्षा हितांवर आधारित आहे. चीनला म्यानमारमध्ये आपला प्रभाव वाढवायचा आहे, यामुळे भारताला चिंता वाटत आहे. भारताला म्यानमारसोबत दहशतवाद, कट्टरता आणि गुन्हेगारीविरोधात सहकार्य वाढवायचं आहे. भारत आपले हित समोर ठेवून निर्णय घेत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSri Lankaश्रीलंकाchinaचीनMyanmarम्यानमारUSअमेरिका