शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

LAC वादासंदर्भात काय आहे चीनचा हेतू ? लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केला खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 12:01 IST

Army Chief General Manoj Pande : सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आले आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले.

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) भारत आणि चीन यांच्यात जवळपास दोन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. आता लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे (Army Chief General Manoj Pande) यांनी तेथील सध्याच्या परिस्थितीवर मोकळेपणाने भाष्य केले आहे. ते म्हणाले की, चीनसोबतचा मूळ प्रश्न हाच सीमाप्रश्नावर तोडगा आहे, पण तो कायम ठेवण्याचा त्यांचा हेतू आहे. दरम्यान, जनरल मनोज पांडे यांनी एक आठवड्यापूर्वी भारतीय लष्कराची कमान हाती घेतली आहे.

सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आले आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले. तसेच, एप्रिल 2020 पूर्वी पूर्वस्थिती पूर्ववत करणे हे भारतीय लष्कराचे उद्दिष्ट आहे आणि सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना त्यांच्या कामात ठाम राहण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले. 

भारतीय लष्कर वास्तविक नियंत्रण रेषेवर महत्त्वात्या ठिकाणी तैनात आहे. लष्कर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी मजबूत स्थितीत आहे. सीमेचे निराकरण हा मुख्य मुद्दा आहे. सीमाप्रश्न कायम ठेवण्याचा चीनचा हेतू असल्याचे आपण पाहतो. एक देश म्हणून आपल्याला 'संपूर्ण राष्ट्र' दृष्टीकोन आवश्यक आहे आणि लष्करी क्षेत्रात, वास्तविक नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना रोखणे आणि त्याचा प्रतिकार करायचा आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले. 

"चर्चेतून तोडगा निघेल, अशी आशा"याचबरोबर, भारत आणि चीन यांच्यातील राजनैतिक आणि लष्करी चर्चेच्या परिणामी पॅंगॉन्ग लेक, गोगरा आणि गलवान येथील पेट्रोल सेंटर 14 च्या उत्तर आणि दक्षिण सीमेवरील सैन्य हटविण्यात आले आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले. यासोबतच ते म्हणाले, 'उर्वरित क्षेत्रातही चर्चेतून तोडगा निघेल, अशी आशा आहे. दोन्ही बाजूंमध्ये विश्वास आणि शांतता प्रस्थापित करण्याचा उद्देश आहे, परंतु ते एका बाजूने होऊ शकत नाही.'  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतchinaचीनindia china faceoffभारत-चीन तणाव