शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सिक्कीमनंतर आता उत्तराखंडमध्ये चिनी सैन्याची घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 17:39 IST

सिक्कीमजवळच्या डोकलाममध्ये भारत आणि चिनी सैन्यामधील संघर्ष कायम असताना आता उत्तराखंडच्या बाराहोतीमध्ये चिनी सैन्याचे घुसखोरी केल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देचिनी सैनिक भारतीय हद्दीत एक किलोमीटर आतपर्यंत आले होते. भारत-चीन आणि भूतानची सीमा रेषा ज्या ट्राय जंक्शनवर मिळते तिथेही चीनने अशाच प्रकारची घुसखोरी केली आहे. जुलै महिन्यात दोन चिनी सैनिक बारहोलीमध्ये दोनशे मीटर आतपर्यंत आले होते.

नवी दिल्ली, दि. 31 - सिक्कीमजवळच्या डोकलाममध्ये भारत आणि चिनी सैन्यामधील संघर्ष कायम असताना आता उत्तराखंडच्या बाराहोतीमध्ये चिनी सैन्याचे घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. टाइम्स नाऊ वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार चिनी सैनिक भारतीय हद्दीत एक किलोमीटर आतपर्यंत आले होते. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या बिजींग भेटीच्या दोन दिवस आधी ही घटना घडली. 

सिक्कीमजवळच्या डोकलाममध्ये भारत-चीन आणि भूतानची सीमा रेषा ज्या ट्राय जंक्शनवर मिळते तिथेही चीनने अशाच प्रकारची घुसखोरी केली आहे. भारताने चीनला इथे रस्ते बांधणीपासून रोखले असून, मागच्या महिन्याभरापासून दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले आहे. उत्तराखंडमध्ये घुसखोरीची घटना 25 जुलैला सकाळी नऊच्या सुमारास घडली. चिनी सैनिक भारतीय हद्दीत एक किलोमीटर आतपर्यंत घुसले होते अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मागच्यावर्षी सुद्धा जुलै महिन्यात दोन चिनी सैनिक बारहोलीमध्ये दोनशे मीटर आतपर्यंत आले होते. त्यावेळी तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दोन्ही देशांमध्ये सीमारेषेची आखणी झाली नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे भारताने त्यावेळी या घटनेला घुसखोरी न ठरवता उल्लंघन म्हटले होते. एनएसए अजित डोवाल यांनी चिनी अधिका-यांची भेट घेतली पण अजूनही डोकलाममध्ये निर्माण झालेला तिढा सुटलेला नाही. 

चीनची दादागिरी नाही खपवून घेणार चीनकडून सातत्याने युद्धखोरीची भाषा केली जात असली तरी, भारताच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही.  डोकलाममध्ये निर्माण झालेला वाद राजकीय आणि कुटनितीक चर्चेतून सोडवण्याचा भारताचा प्रयत्न चालू राहिल पण त्याचवेळी चीनने भूतानवर दादागिरीचा प्रयत्न केल्यास खपवून घेणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. चीनच्या भूतानवरील कोणत्याही दडपशाहीला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची भारताची रणनिती असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

11 हजार फूट उंचीवर सिक्कीम-भूतान-तिबेट ट्राय जंक्शनवर हळूहळू भारताने आपली स्थिती मजबूत केली आहे. परिस्थिती आणि गरजेनुसार इथे अतिरिक्त सैन्य तुकडीची तैनाती केली जाईल. चीनच्या सरकारी माध्यमांमधून दररोज भारताला धमक्या, इशारे दिले जात असले तरी, भारताने कुटनितिक चर्चेचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. ट्राय जंक्शन येथे असलेल्या डोकलाममध्ये चीनने रस्ते बांधणीचा प्रयत्न केल्यापासून या भागातील शांतता भंग पावली आहे.