शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

LACजवळ चीननं वाढवल्या हेलिकॉप्टर्सच्या घिरट्या; एअरबेसवर भारताची करडी नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 17:26 IST

गेल्या 8-10 दिवसांपासून सीमेच्या दोन्ही बाजूंनी खळबळ उडाली आहे, अशा परिस्थितीत चीन सतत आपले सामर्थ्य बळकट करत असल्याचे दिसते.

नवी दिल्लीः लडाख प्रदेशात भारत आणि चीनमध्ये अजूनही तणाव कायम आहे. दोन्ही देशांमधला हा सीमावाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 6 जून रोजी झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, परंतु यादरम्यान चीनने पुन्हा एकदा सीमेवर हालचाली वाढवल्या आहेत. पूर्व लडाखच्या आसपासच्या सीमेजवळ चीनने हेलिकॉप्टरच्या हालचाली तीव्र केल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर लडाखजवळ जमलेल्या चिनी सैनिकांना मदत करण्यासाठी वापरण्यात येत आहेत. गेल्या 8-10 दिवसांपासून सीमेच्या दोन्ही बाजूंनी खळबळ उडाली आहे, अशा परिस्थितीत चीन सतत आपले सामर्थ्य बळकट करत असल्याचे दिसते.या दिवसात चीनकडून पेट्रोलिंग, वस्तूंच्या पुरवठ्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात होता, परंतु आता ते सर्व भारताच्या सीमेवर उडत आहेत. या व्यतिरिक्त चायनीज आर्मी पीएलएची लढाऊ विमानंही पूर्व लडाखजवळ एलएसीवर उडत असल्याचे दिसून आले आहे. चीनच्या हुतान आणि गलगुन्सा तळांवरही भारत नजर ठेवून आहे आणि चीनच्या प्रत्येक हालचालींवर भारताचं लक्ष आहे. महत्त्वाचे म्हणजे मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. परंतु यापूर्वी चीनने कधीही लढाऊ विमान सीमेवर तैनात केली नव्हती, त्यामुळे आता परिस्थिती आणखी तीव्र बनली. आणि 2017मध्ये डोकलामदरम्यान निर्माण झालेल्या परिस्थितीच्या हा वाद पुढे गेला आहे.पूर्वीच्या लडाखजवळील क्षेत्र हुतान-गलगुन्सा तळाजवळ 10-12 चिनी लढाऊ विमानं तैनात करण्यात आली आहेत. एवढेच नाही तर चिनी विमानं हे पूर्व लडाखच्या पूर्वेस 30 किमी अंतरावर आहेत. आता ती विमानं तिकडे उडताना दिसली आहेत, जे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार भारतीय सीमेच्या दहा किमी फक्त दूर आहे. भारत आणि चीनमधील या वादावर 6 जून रोजी लेफ्टनंट जनरल लेव्हलची बैठक झाली होती, परंतु अद्याप तोडगा निघाला नाही. दोन्ही देशांमध्ये चर्चा अद्यापही सुरू आहे.  

टॅग्स :chinaचीनIndiaभारत