शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व लडाखच्या सीमेवर चीनने उभारला होता मोठा लष्करी तळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 06:08 IST

ड्रॅगनची हाेती माेठी तयारी, उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांतून सत्य उजेडात

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गोग्रा हॉट स्प्रिंग्ज या भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्या भागातून चिनी लष्कराने आपले सैनिक ३ किमी अंतरापर्यंत माघारी नेेले. दोन्ही देशांत याबाबत झालेल्या निर्णयानुसार हे पाऊल उचलण्यात आले. मात्र, गोग्रा हॉट स्प्रिंग्ज भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनने मोठा लष्करीतळ उभारला होता, पण आता तो तळ चीनने हलविला आहे, असे एका उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांतून स्पष्ट झाले आहे. 

गोग्रा हॉट स्प्रिंग्ज येेथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच्या भागात चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्या भागात चीनचे सैनिक येण्याआधीची व नंतरची उपग्रहाने काढलेली नवी छायाचित्रे उपलब्ध झाली आहेत. 

तोफगोळ्यांच्या माऱ्याची केली होती सज्जताचीनने गोग्रा हॉट स्प्रिंग्ज येथील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेलगतच्या भागातून आपले सैन्य माघारी नेले, त्यावेळी हा मोठा लष्करीतळदेखील तिथून हलविला. तोफांनी सीमेपलीकडे मारा करण्यासाठी या तळाभोवती चीनने तसे मोर्चेदेखील बांधले होते. हे उपग्रहाद्वारे १५ सप्टेंबर टिपलेल्या छायाचित्रांतून स्पष्ट झाले आहे. या लष्करीतळाचे बांधकाम आता पाडले आहे. तसेच तेथील ढिगारा हलविण्यात आला आहे. 

चीनने लष्करी तळ हलविलाया भागात दोन्ही देशांपैकी कोणीही पेट्रोलिंग करू नये असे ठरविण्यात आले होते. तरीही चीनच्या सैनिकांनी या भागात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. इतकेच नव्हे तर मोठा लष्करीतळही उभारला होता. तो चीनने आता हलविला आहे. 

सैन्य माघारीची प्रक्रिया झाली पूर्णपूर्व लडाखमधील गोग्रा हॉट स्प्रिंग्ज भागातील भारत व चीनचे सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया गेल्या मंगळवारी पूर्ण झाली. भारत व चीनच्या लष्करामध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावर चर्चेच्या १६ व्या फेरीत सैन्य माघारीचा निर्णय घेण्यात आला होता. चीनच्या लष्कराने पूर्व लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला हाेता. गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यात झालेल्या संघर्षामुळे या तणावात भर पडली होती.

 

 

टॅग्स :chinaचीनladakhलडाख