मणिपूर हिंसाचारावर माजी लष्करप्रमुख एमएम नरवणेंचे सूचक विधान; म्हणाले, “चीनकडून मदत...”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 05:11 PM2023-07-29T17:11:13+5:302023-07-29T17:13:18+5:30

MM Naravane On Manipur Violence: सीमावर्ती राज्यांमधील अस्थिरता देशाच्या एकूण राष्ट्रीय सुरक्षेसाठी चांगली नाही, असे एमएम नरवणे यांनी म्हटले आहे.

china foreign agencies maybe involved in north east manipur violence said mm naravane | मणिपूर हिंसाचारावर माजी लष्करप्रमुख एमएम नरवणेंचे सूचक विधान; म्हणाले, “चीनकडून मदत...”

मणिपूर हिंसाचारावर माजी लष्करप्रमुख एमएम नरवणेंचे सूचक विधान; म्हणाले, “चीनकडून मदत...”

googlenewsNext

MM Naravane On Manipur Violence: मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, सत्ताधारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाची दखल घेतली असून, सरकारवर ताशेरे ओढले आहेत. केंद्रातील मोदी सरकावर निशाणा साधला जात आहे. विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ मणिपूर दौऱ्यावर जाणार आहे. यातच आता माजी लष्करप्रमुख एमएम नरवणे दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिप्रेक्ष्यांवर चर्चेदरम्यान मणिपूर हिंसाचारावर सूचक भाष्य केले आहे. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून बराच गदारोळ झाला. माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) एमएम नरवणे यांनी मणिपूर हिंसाचारावर व्यक्त केलेल्या शंकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. सीमावर्ती राज्यांमधील अस्थिरता देशाच्या एकूण राष्ट्रीय सुरक्षेसाठी चांगली नाही. मणिपूरमधील बंडखोर संघटनांना चीनकडून मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळते. ईशान्य भारतातील बंडखोर संघटनांना याआधीपासून चीनकडून मदत मिळत आहे आणि यापुढेही मिळत राहील. मला खात्री आहे की ज्यांच्याकडे सत्ता आहे ते याची दखल घेतील, असे नरवणे यांनी म्हटले आहे. 

अमली पदार्थांची तस्करी नेहमीच होत असते

ईशान्य भारतात अमली पदार्थांची तस्करी फार पूर्वीपासून होत आहे आणि गेल्या काही वर्षांत जप्त केलेल्या अमली पदार्थांचे प्रमाण वाढले आहे. गोल्डन ट्रँगलपासून (थायलंड, म्यानमार आणि लाओसच्या सीमा जिथे मिळतात ते क्षेत्र) आपण थोड्याच अंतरावर आहोत. म्यानमारमध्ये नेहमीच अशांतता आणि लष्करी राजवट राहिली आहे, असेही नरवणे यांनी सांगितले. 

दरम्यान, विरोधी पक्षांनी नवी रणनीती आखली आहे. INDIA विरोधी आघाडीतील खासदारांचे शिष्टमंडळ मणिपूरला दौऱ्यावर जाणार आहे. हे शिष्टमंडळ हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या २० हून अधिक खासदारांचे शिष्टमंडळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मणिपूरला भेट देणार आहे.
 

Web Title: china foreign agencies maybe involved in north east manipur violence said mm naravane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.