शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये लढाईची धमक नाही, भारताला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 12:31 IST

सिक्कीमजवळच्या डोकलाममध्ये निर्माण झालेल्या संघर्षावरुन चीनकडून वारंवार युद्धाची भाषा केली जात असली तरी, चीन युद्धाचा धोका पत्करणार नाही

ठळक मुद्देचीन युद्धाचा धोका पत्करणार नाही किंवा मर्यादीत स्वरुपाच्या लढाईचे पाऊल सुद्धा उचलणार नाही सिक्कीम-भूतान-तिबेट या ट्राय जंक्शनजवळ चीनच्या रस्ता बांधणीच्या हट्टामुळे हा संपूर्ण संघर्ष निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली, दि. 7 - सिक्कीमजवळच्या डोकलाममध्ये निर्माण झालेल्या संघर्षावरुन चीनकडून वारंवार युद्धाची भाषा केली जात असली तरी, चीन युद्धाचा धोका पत्करणार नाही किंवा मर्यादीत स्वरुपाच्या लढाईचे पाऊल सुद्धा उचलणार नाही असा विश्वास भारतीय सुरक्षा यंत्रणांना  आहे. भूतानच्या हद्दीतील डोकलाममधून भारत आणि चीनने सैन्य मागे घेणे हाच दोन्ही देशांसाठी उत्तम पर्याय आहे असे सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांनी सांगितले. 

सिक्कीम-भूतान-तिबेट या ट्राय जंक्शनजवळ चीनच्या रस्ता बांधणीच्या हट्टामुळे हा संपूर्ण संघर्ष निर्माण झाला आहे. चीनने उद्या अशी कोणती आगळीक केलीच किंवा युद्धाची परिस्थिती उदभवली तर भारतीय लष्कर उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे असे भारतीय सुरक्षा दलातील सूत्रांनी सांगितले. गेल्या 50 दिवसांपासून हा संघर्ष सुरु असून युद्धा हा या समस्येवर उपाय नाही हे भारताने आधीच स्पष्ट केले आहे. व्दिपक्षीय चर्चा, संयमाने  तणाव कमी होऊ शकतो असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मागच्या आठवडयात संसदेत सांगितले आहे. 

चीन ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या तयारीतभारतीय सैन्याला डोकलाम भागातून हटविण्यासाठी चीन तिथे छोटे युद्ध पुकारू शकते, असा इशारा चीनमधील तज्ज्ञांनी दिला आहे. सर्जिकल स्ट्राइकप्रमाणे ही कारवाई असेल, असे सांगण्यात येते. मोदी सरकार देशाला युद्धाच्या खाईत लोटत आहे, असा आरोपही चीनी वृत्तपत्रांनी केला आहे. डोकलाममध्ये चीनने रस्ता बांधण्याचे प्रयत्न केल्यापासून भारतीय सैन्य तिथे आहे. ते हटविण्यासाठी चीनी सैन्य दोन आठवड्यांत कारवाई करू शकते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

युद्धाची तयारी सुरूभारताविरोधात चीन लष्करी ऑपरेशन करू शकते, असे शांघाय अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेसमधील आंतरराष्ट्रीय विषयांचे संशोधक यांचे म्हणणे आहे. डोकलाममध्ये चीनी लष्कर शस्त्रास्त्रांचा वापरू शकतो, असे त्यांच्या युद्धाभ्यासावरून स्पष्ट होते. भारताची उक्ती व कृतीमध्ये खूपच अंतर आहे, असे सेंटर फॉर एशिया-पॅसिफिक स्टडी सेंटरचे संचालक जाओ गेनचेंग यांनीही म्हटले आहे. भारतीय सैन्याला माघार घेण्यास भाग पाडणे वा त्यांना ताब्यात घेणे, हा चीनचा या ऑपरेशनचा हेतू असेल.