शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
4
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
5
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
6
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
7
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
8
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
9
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
10
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
11
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
13
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
14
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
15
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
16
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
17
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
18
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
19
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
20
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड

चीनने भारतीय सीमेवर  जमविले १८ हजार सैनिक, अरुणाचलमध्ये अतिरिक्त चार कॅब तैनात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 08:39 IST

प्रत्येक कॅबमध्ये ४५०० जवान, तोफखाना आणि यंत्रसामग्रीचा समावेश असतो, असे चीनवर लक्ष ठेवणाऱ्या निरीक्षकांनी सांगितले.

नवी दिल्ली : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) सिक्कीमलगतच्या २०० किमी व अरुणाचल प्रदेशलगतच्या ११२६ किमी लांबीच्या सीमेवर अतिरिक्त चार कॅब तैनात करणे सुरूच ठेवले आहे. प्रत्येक कॅबमध्ये ४५०० जवान, तोफखाना आणि यंत्रसामग्रीचा समावेश असतो, असे चीनवर लक्ष ठेवणाऱ्या निरीक्षकांनी सांगितले.

सिलीगुडीजवळच्या चुम्बी खोऱ्यात व तवांगजवळील कोना भागात प्रत्येकी एक तर अरुणाचल प्रदेशच्या वालोंग क्षेत्रालगत दोन कॅब तैनात करण्यात आल्या आहेत. कॅब माघारी जाण्याचे कोणतेही संकेत नाहीत. त्या हिवाळ्यातही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ राहणार असल्याने भारतानेही सैन्य तैनातीत बदल केला आहे.

चीनला भारतच निपटू शकतो : राहुल गांधीरशिया ज्याप्रमाणे युक्रेनला ‘नाटो’ मध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी युद्धाच्या धमक्या देत होता, त्याचप्रमाणे भारताने अमेरिकेकडे झुकू नये म्हणून चीन घुसखोरीच्या कारवाया करत आहे, असे असले तरी चीनशी पाश्चिमात्य देश नव्हे तर भारतच निपटू शकतो, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. एमएनएमचे प्रमुख कमल हासन यांच्याशी संवाद साधत होते. चीनसोबतच्या सीमा समस्येचे कारण भारताची अंतर्गत परिस्थिती असल्याचे मतही राहुल गांधी यांनी व्यक्त केले.  देशात अंतर्गत संघर्ष होतात, तेव्हा विरोधक या परिस्थितीचा फायदा घेतात, असे राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन