शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

चीनची आगळीक सुरूच; 30 दिवसांत 35 वेळा घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 08:48 IST

संवेदनशील भागांमध्ये चिनी सैन्याची घुसखोरी

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून चीनकडून वारंवार घुसखोरी केली जातं आहे. गेल्या महिन्याभरात चिनी सैन्यानं तब्बल 35 वेळा भारतीय हद्दीत प्रवेश केला आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी (आयटीबीपी) या घुसखोरीला तीव्र विरोध केल्यामुळे चिनी सैन्याला माघार घ्यावी लागली. एका बाजूला पाकिस्तानकडून दररोज शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू असताना दुसऱ्या बाजूला चीननं घुसखोरी सुरू केल्यानं भारताची डोकेदुखी वाढली आहे. एका हिंदी संकेतस्थळानं दिलेल्या वृत्तानुसार, एप्रिल महिन्यात चिनी सैन्यानं लडाखच्या उत्तर भागात सकाळी 7 वाजता घुसखोरी केली. चिनी सैनिक त्यांच्या वाहनातून जवळपास 14 किलोमीटर आत घुसले होते. त्यानंतर त्यांना इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी रोखलं. याशिवाय चिनी सैन्यानं लडाखच्या ट्रिग हाईट भागातदेखील अनेकदा घुसखोरी केली आहे. 18 मार्च, 21 मार्च, 24 मार्च आणि 30 मार्चला चिनी सैन्य भारतीय हद्दीत 8 किलोमीटरपर्यंत आलं होतं. आयटीबीपीच्या अहवालानुसार, लडाखच्या ट्रॅक जंक्शन येथे सकाळी साडे आठ वाजता चिनी हेलिकॉप्टरनं घुसखोरी केली. चिनी हेलिकॉप्टर जवळपास 18 किलोमीटर भारतीय हद्दीत आलं होतं. याचाही आयटीबीपीनं विरोध केला. याबद्दलचा अहवाल आयटीबीपीकडून गृह मंत्रालयाला पाठवण्यात आला आहे. चिनी सैन्यानं 29 आणि 30 मार्चला अरुणाचल प्रदेशातील असफिला भागात 4 किलोमीटरपर्यंत घुसखोरी केल्याची माहिती या अहवालात आहे.22 मार्चला अरुणाचल प्रदेशच्या डिचू भागात सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी चिनी सैनिक 250 मीटरपर्यंत भारतीय हद्दीत आले होते. यावेळी आयटीबीपी आणि चिनी सैन्यात जोरदार खडाजंगी झाली. यानंतर चिनी सैन्य मागे हटलं. भारत-चीन सीमेवरील अतिसंवेदनशील आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागांमध्ये चिनी सैन्याकडून वारंवार घुसखोरी केली जात आहे. भारतीय सैन्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न चीनकडून सुरू आहेत.  

टॅग्स :chinaचीनinfiltrationघुसखोरीIndian Armyभारतीय जवान