शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री ताफ्यातील कारच्या धडकेने चिमुकला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 03:13 IST

उत्तर प्रदेशचे मंत्री ओम प्रकाश राजभर यांच्या ताफ्यातील कारच्या धडकेने पाच वर्षांच्या मुलाच्या झालेल्या मृत्युच्या घटनेचा अहवाल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मागवला आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशचे मंत्री ओम प्रकाश राजभर यांच्या ताफ्यातील कारच्या धडकेने पाच वर्षांच्या मुलाच्या झालेल्या मृत्युच्या घटनेचा अहवाल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मागवला आहे.कर्नलगंजनजिक (जिल्हा गोंडा) शनिवारी झालेल्या या घटनेच्या वेळी मी त्या ताफ्यातून प्रवास करीत नव्हतो, असे राजभर यांनी ठासून सांगितले. उत्तर प्रदेशात नगर पंचायतींच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घटनेवरून विरोधी पक्षांनी सरकारवर हल्ले सुरू केले आहेत. राजभर यांच्या वाहनांच्या ताफ्यातील एक कार कर्नलगंजमधून जाताना शिवा गोस्वामी या मुलाला धडकली. त्याला रुग्णालयात नेण्यात येत असताना त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.ही घटना पाहणारे आणि मुलाच्या कुटुंबियांनी ताफ्यातील कोणीही मुलाच्या मदतीसाठी थांबले नसल्याचा आरोप केला. मुलाचे वडील विश्वनाथ यांनी मंत्री राजभर हे फुलांच्या माळांनी सजवलेल्या एका कारमधून निघून गेल्याचा आरोप केला. तथापि, ही घटना घडली त्यावेळी मी २५ किलोमीटर दूर होतो, असा दावा मंत्र्यांनी केला. मुलगा रस्त्याच्या बाजुला खेळत असताना ताफ्यातील एका कारने त्याला धडक दिली तेव्हा त्याची आई आणि आजी जवळच होती. संतापलेल्या ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून कारवाईची मागणी केली.

टॅग्स :Accidentअपघात