व्याजाचा मोबदला म्हणून मुलाची पिळवणूक मुलाच्या माता-पित्यास डांबले : दोन सावकारांचे कृत्य
By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST
सोलापूर :
व्याजाचा मोबदला म्हणून मुलाची पिळवणूक मुलाच्या माता-पित्यास डांबले : दोन सावकारांचे कृत्य
सोलापूर : वीटभीवर काम करणार्या एका दाम्पत्याने कर्जाने घेतलेले पैसे व्याजासह देऊन टाकले. असे असतानाही रक्कम येणेबाकी असल्याचे धमकावत व्याजाच्या रकमेत त्याच्या मुलास जबरदस्तीने कामावर ठेवून त्याची पिळवणूक करणार्या दोन सावकारांवर सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुलास घेऊन जाण्यासाठी आलेल्या त्याच्या माता-पित्यास डांबून ठेवत मारहाणही केली. यल्लप्पा विठ्ठल जाधव आणि दशरथ गायकवाड अशी सावकारी व्यवसाय करणार्यांची नावे आहेत. डोणगाव रोडवर यल्लप्पा जाधव याची वीटभी आहे. त्यावर मच्छिंद्र विठ्ठल कसबे आणि त्याची पत्नी हे दोघे कामास आहेत. मच्छिंद्रने यल्लप्पाकडून ३० हजार रुपये व्याजाने घेतले होते. कर्जाची रक्कम व्याजासह परतफेड करूनही यल्लप्पा आणि त्याचा साथीदार दशरथ हे दोघे पैशासाठी मच्छिंद्रकडे तगादा लावले होते. व्याज येणे आहे असे सांगून दोघा सावकारांनी मच्छिंद्र याचा मुलगा शंकर याला कामाला ठेवले. व्याजाच्या रकमेत त्याची पिळवणूक करुन घेत होते. दरम्यान, मुलास घेऊन जाण्यासाठी कसबे पती-पत्नी वीटभीवर आले असता दोघा आरोपींनी त्यांना बेदम मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मच्छिंद्र कसबे याच्या फिर्यादीनुसार तपास फौजदार पाटील करीत आहेत. (प्रतिनिधी)