शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: पुढील महिन्यापासून लहान मुलांनाही मिळणार कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 06:21 IST

औषध महानियंत्रकांनी भारत बायोटेकला २ ते १८ वयोगटातील मुलांवर लसीच्या नैदानिक चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत. 

नवी दिल्ली - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे. पार्श्वभूमीवर १८ वर्षे वयापर्यंतच्या मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जाणार आहे. १२ ते १८ वयोगटातील मुलांचे पुढील महिन्यापासून लसीकरण केले जाईल, असे सूतोवाच नवनियुक्त केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी केले आहे. 

झायकोव्ह डी

निर्माती कंपनी : झायडस

लसीच्या नैदानिक चाचण्या पूर्ण झाल्या असून आपत्कालीन वापराच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

कोव्हॅक्सिन

निर्माती कंपनी : भारत बायोटेक

औषध महानियंत्रकांनी भारत बायोटेकला २ ते १८ वयोगटातील मुलांवर लसीच्या नैदानिक चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत. सप्टेंबरपूर्वी या चाचण्या पूर्ण होऊन आपत्कालीन वापराची मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. 

फायझर

निर्माती कंपनी : फायझर

या लसीला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने परवानगी दिली आहे. फायझरने भारत सरकारकडे लस परवान्यासाठी अर्ज केला असून त्यास मंजुरी मिळणे अपेक्षित आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे म्हणणे...

अखिल भारतीया आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार सप्टेंबरपर्यंत झायडस, भारत बायोटेक आणि फायझर या तीनही कंपन्यांच्या लसींना मान्यता मिळण्याची शक्यता आहे. लसींमुळे मुलांचा कोरोनापासून बचाव होऊ शकतो आणि संक्रमणाची साखळी तोडली जाऊ शकते, असे डॉ. गुलेरिया म्हणाले. 

‘द लॅन्सेट’ या विज्ञान विषयाला वाहिलेल्या मासिकात अलीकडेच प्रकाशित झालेल्या अभ्यास अहवालात ११ ते १७ वयोगटातील मुलांबरोबर राहात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोना होण्याचा धोका १८ ते ३० टक्क्यांनी वाढतो. या कारणांमुळेच मुलांना विद्यालयांत पाठवण्यास नकार दिला जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या