शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआरसी’तून वगळलेल्या मुलांना ‘डिटेन्शन कॅम्प’मध्ये ठेवणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 06:15 IST

आसाममध्ये ‘नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स’मधून (एनआरसी) पालकांचा समावेश होऊनही वगळल्या गेलेल्या फक्त लहान मुलांना सध्या तरी ‘डिटेन्शन कॅम्प’मध्ये ठेवले जाणार नाही,

नवी दिल्ली : आसाममध्ये ‘नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स’मधून (एनआरसी) पालकांचा समावेश होऊनही वगळल्या गेलेल्या फक्त लहान मुलांना सध्या तरी ‘डिटेन्शन कॅम्प’मध्ये ठेवले जाणार नाही, असे आश्वासन अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयास दिले.आसामच्या ‘एनआरसी’ यादीतून १९ लाखांहून अधिक नागरिकांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यातही एकाच कुटुंबातील पालकांची नावे यादीत आहेत; पण त्यांच्या मुलांना मात्र यादीतून वगळले गेल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या संदर्भात तेथील एका स्वयंसेवी संस्थेने त्या अनुषंगाने ‘एनआरसी’ यादी दुरुस्त करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे.सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. भूषण गवई व न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे या अर्जावर अल्प सुनावणी झाली तेव्हा वरीलप्रमाणे आश्वासन देत अ‍ॅटर्नी जनरल म्हणाले की, लहान मुलांची कुटुंबापासून फारकत करून त्यांना ‘डिटेन्शन कॅम्प’मध्ये पाठविले जाण्याची मी कल्पनाही करू शकत नाही. ज्यांच्या पालकांची नावे ‘एनआरसी’मध्ये आहेत अशा मुलांना ‘डिटेन्शन कॅम्प’मध्ये पाठविले जाणार नाही. या आश्वासनाची न्यायालयाने नोंद घेतली.> समन्वयकाकडून मागविला खुलासाआसाममध्ये नव्याने नेमण्यात आलेले ‘एनआरसी’ समन्वयक हितेश शर्मा यांनी, त्या पदावर नेमले जाण्यापूर्वी, बंगाली मुस्लिम आणि रोहिंग्यांच्या विरोधात फेसबुकवर अनेक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती याकडे लक्ष वेधणारा आणखी एक अर्ज न्यायालयात करण्यात आला.त्याविषयी विचारता आसाम सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, ‘एनआरसी’चे काम आता संपलेले असल्याने हितेश शर्मा यांना आता त्यात काहीच भूमिका राहिलेली नाही. तरीही खंडपीठाने या संदर्भात शर्मा यांच्याकडून खुलासा मागविला व संदर्भित आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकली जावीत, असे राज्य सरकारला सांगितले.