शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

निराधारांचे आधार ! कधी एकेकाळी एकही मुल नसलेलं दांपत्य आज 51 मुलांचे आई-वडिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 11:11 IST

शेतकरी असणा-या या दांपत्याला मुल होत नसल्याने प्रचंड नैराश्यग्रस्त झाले होते. 1990 मध्ये त्यांनी एका अपंग मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि आज ते जवळपास 51 मुलांचे पालक आहेत

ठळक मुद्देमुल होत नसल्याने सतत तक्रार करणा-यांसमोर मुझफ्फरनगरमधील दांपत्याने एक उदाहरण ठेवलं आहेशेतकरी असणा-या या दांपत्याला मुल होत नसल्याने प्रचंड नैराश्यग्रस्त झाले होते1990 मध्ये त्यांनी एका अपंग मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि आज ते जवळपास 51 मुलांचे पालक आहेत

मुझफ्परनगर - कधीतरी आयुष्यात अशी एखादी पोकळी असते ज्यामुळे संपुर्ण आयुष्यच पालटून जातं. एकेकाळी पोकळी वाटणारी निर्माण करणारी ही गोष्ट आपल्याला समृद्ध करुन टाकते. असंच काहीसं मुझफ्फरनगरमधील एका दांपत्यासोबत घडलं आहे. शेतकरी असणा-या या दांपत्याला मुल होत नसल्याने प्रचंड नैराश्यग्रस्त झाले होते. 1990 मध्ये त्यांनी एका अपंग मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि आज ते जवळपास 51 मुलांचे पालक आहेत. मुल होत नसल्याने सतत तक्रार करणा-यांसमोर या दांपत्याने एक उदाहरण ठेवलं आहे. 

शामली येथील कुदाना गावातील मीना राणा यांचं 1981 मध्ये बाघतपच्या विरेंद्र राणा यांच्याशी लग्न झालं होतं. लग्नाच्या 10 वर्षानंतरही त्यांना मुल होत नव्हतं. मूल व्हावं यासाठी त्यांनी रुग्णालयाच्या फे-या मारल्या, पण काहीच फायदा झाला नाही. तपासणीअंती मीना कधीच आई होऊ शकत नाहीत असं निष्पन्न झालं. 1990 साली दोघेही शुक्रतालमध्ये येऊन राहू लागले. येथे दोघांनी एका मुलाला दत्तक घेतलं. मांगेराम असं त्याचं नामकरण केलं. पण त्यांच्या नशिबाचा खेळ अद्याप संपला नव्हता. पाच वर्षांनी मांगेरामचं निधन झालं आणि नशिबाने पुन्हा एकदा त्यांची परिक्षा घेण्याचं ठरवलं. पण दोघांनीही हार मानायची नाही असा निश्चयच केला होता. दोघांनीही निराधार मुलांना आपल्या घरी आश्रय देण्यास सुरुवात केली. 

शुक्रताल येथे दांपत्याला आठ एकर जमीन देणगीत मिळाली होती. या जमिनीवर त्यांनी अनाथाश्रम सुरु केला असून मुलांचा सांभाळ करतात. येथे त्यांनी एक शाळाही सुरु केली आहे. सध्या येथे 46 मुलं आहेत. दांपत्याच्या मदतीने काहीजण आज मोठ्या कंपनीत रुजू झाले आहेत. काहीजण नोकरीसाठी शहराबाहेर पडली आहेत. अनेकांचं लग्नही त्यांनी लावून दिलं. हे सर्व त्यांनी केलं ते फक्त आणि फक्त देणगींच्या मदतीने. 

आपली मुलं हिंदू आहेत की मुस्लिम याच्याने आपल्याला काहीच फरक पडत नसल्याचं मीना सांगतात. त्या सांगतात, 'ही मुलं माझी आहे फक्त एवढंच मला माहिती आहे'. सध्या त्यांच्याकडे एकूण 46 मुलं असून यामध्ये 19 मुली आणि 27 मुलं आहेत. यामधील अनेकजण अपंग आहेत. अनाथाश्रममध्ये मुलांना खेळण्यासाठी एक मोठं मैदानही तयार करण्यात आलं आहे. राहण्यासाठी उत्तम खोल्या असून, किचनदेखील भलंमोठं आहे. 

शुक्रताल ग्रामपंचायतीने आपल्या जमिनीचा मोठा तुकडा दिला होता. अनेक महत्वाच्या आणि गरजेच्या गोष्टींसाठी आपल्याला देणगीवरच अवलंबून राहावं लागतं. आपले शेजारी आपल्याला धान्य आणि इतर गरजेच्या गोष्टी पुरवतात असं विरेंद्र सांगतात. येथे राहणारी 22 वर्षीय ममता आता जिल्ह्यातील एका कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्यूएट करत आहे. जर मीना आणि विरेंद्र यांनी आपला सांभाळ केला नसता, तर आपण आज कुठे असतो, आपल्या भविष्याचं काय झालं असतं माहित नाही असं ममता सांगते. सतत तक्रार करणा-यांसाठी मीना आणि विरेंद्र एक आदर्शच आहे. 

टॅग्स :Familyपरिवार