शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ह्दयद्रावक! उपचाराविना ६ तास दिल्लीच्या रस्त्यावर भटकले; अखेर रुग्णवाहिकेतच चिमुकल्याने जीव सोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 10:36 IST

या रुग्णालयात १० मिनिटे डॉक्टरांच्या टीमने मुलावर उपचार केले आणि आईवडिलांनी पुढील उपचारासाठी  एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये जाण्याचा सल्ला दिला.

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीच्या सरकारी हॉस्पिटलमधील एक भयंकर प्रकार समोर आला आहे. ज्याठिकाणी डॉक्टरांवर बेजबाबदारपणाचा आरोप लावण्यात आला आहे. मजनू का टिला नावाच्या परिसरात राहणाऱ्या दाम्पत्याचा दीड वर्षाचा मुलगा घराच्या चौथ्या मजल्यावरून अचानक खाली पडला, त्यानंतर या धावपळीत त्याला आईवडिलांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेलं होतं.

या रुग्णालयात १० मिनिटे डॉक्टरांच्या टीमने मुलावर उपचार केले आणि आईवडिलांनी पुढील उपचारासाठी  एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये जाण्याचा सल्ला दिला. कारण या रुग्णालयात व्हेटिंलेटरचा अभाव आहे. आई वडिलांनी रुग्णावाहिकेतून लहानग्या चिमुरड्याला घेऊन दिल्लीच्या सफदरजंग रूग्णालय गाठलं, येथील डॉक्टरांनी आईवडिलांना ताटकाळत ठेवत शेवटी याठिकाणी बेड उपलब्ध नसल्याचं सांगत एम्सला जावा, म्हटलं, मुलाच्या चिंतेत असणारे आईवडील पुन्हा मुलाला घेऊन एम्सला पोहचले. येथेही डॉक्टरांनी बेड उपलब्ध नसल्याचं सांगत एम्सच्या ट्रामा सेंटरला जाण्यास सांगितले.

ज्यावेळी आईवडील जखमी अवस्थेत मुलाला घेऊन ट्रामा सेंटरमध्ये पोहचले तेव्हा तिथेही बेड उपलब्ध नव्हता. त्यानंतर मुलाला घेऊन आरएमएल हॉस्पिटलला गेले, तेथेही डॉक्टरांनी सहकार्य न करता दुसऱ्या रुग्णालयात मुलाला घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर आईवडील मुलाला दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात घेऊन आले, तेथे आयसीयू बेड नव्हता. दिल्लीच्या रस्त्यावर ६ तास भटकत असलेल्या आईवडिलांना एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मुलाला पळवावं लागलं. अखेर रुग्णवाहिकेत ऑक्सिजन संपल्यानंतर मुलाने अखेरचा श्वास घेतला.

राजधानी दिल्लीत अशाप्रकारे घडलेल्या भयंकर प्रकारामुळे अनेक प्रश्नचिन्ह उभे आहेत, मुलाचा जीव गेल्यानंतर आईवडिलांनी हंबरडा फोडला, मोठ-मोठ्या हॉस्पिटलच्या चक्करा मारूनही मुलावर उपचार करता आले नाहीत, त्यामुळे मुलाचा मृत्यू झाला.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल