शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कार देत नाही म्हणून मुलाने आई-वडिलांवर केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 14:34 IST

आई-वडिलांनी नवीन कार  घेऊन द्यायला नकार दिला म्हणून एका 23 वर्षाच्या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने आपल्या पालकांवरच हल्ला केला.

ठळक मुद्देआई-वडिल नवीन कार देत नाही म्हणून स्वातंत्र्यदिनी विनयने घरात आकांड-तांडव केले. शो केसची काच डोळयाला लागून विनयची आई जखमी झाली.

बंगळुरु, दि. 21 - आई-वडिलांनी नवीन कार  घेऊन द्यायला नकार दिला म्हणून एका 23 वर्षाच्या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने आपल्या पालकांवरच हल्ला केला. पश्चिम बंगळुरुच्या राजाजीनगरमध्ये 15 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. वडिल बी.जी. चंद्रहाय यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी बी.सी.विनयला अटक केली आहे. तो खासगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये कॉम्युटर सायन्सच्या शाखेमध्ये शिक्षण घेत आहे. बी.जी. चंद्रहाय हे जमीनदार आणि छोटे कंत्राटदार आहेत. 

आई-वडिल नवीन कार देत नाही म्हणून स्वातंत्र्यदिनी विनयने घरात आकांड-तांडव केले. त्याने घरातील टीव्ही, मोबाईल आणि शो केस फोडला. या दरम्यान शो केसची काच डोळयाला लागून विनयची आई जखमी झाली. वडिलांनी रोखण्याचा प्रयत्न करताना विनयने त्यांनाही मारहाण केली. विनय घरातील मोठा मुलगा असून त्याचा लहान भाऊ मदनने बारावी झाल्यानंतर शिक्षण सोडून दिले. 

मदन वडिल चंद्रहाय यांनी उद्योगामध्ये मदत करत होता. वर्षभरापूर्वी चंद्रहाय यांनी मदनला नवीन जीप विकत घेऊन दिली. तेव्हापासून विनयने आई-वडिलांकडे नवीन कार विकत घेऊन देण्याचा तगादा लावला होता. कारच्या मागणीवरुन विनयचे घरात दररोज आई-वडिलांबरोबर भांडण सुरु होते.  स्वातंत्र्यदिनी दुपारी 2 च्या सुमारास या वादाने टोक गाठले.  विनयने आई-वडिलांकडे नव्या कारची मागणी केली. नेहमीप्रमाणे त्याला नकार मिळताच

विनय संतापला. त्याने घरात आदळ-आपट सुरु केली अशी माहिती सुब्रमण्यम नगर पोलिसांनी दिली. वडिल आणि मुलामधला संघर्ष पोलिसांना अजिबात नवीन नाही. यापूर्वी दोनवेळा चंद्रहाय यांनी मुलाकडून होणा-या त्रासाबद्दल पोलिसांकडे धाव घेतली होती. पण पोलिसांनी इशारा देऊन विनयला सोडले. यावेळी मात्र पोलिसांनी चंद्रहाय यांना तक्रार करायला लावली. आई-वडिलांना मारहाण त्यांना धमकावणे या आरोपांखाली पोलिसांनी विनय विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पाच कलमातंर्गत गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

विनयने माफी मागितल्यामुळे चंद्रहाय यांना आता मुलाविरोधातील तक्रार मागे घ्यायची आहे. पण विनयला अटक करुन पुढची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे तक्रार मागे घेणे शक्य नाही. आता यापुढे सर्व काही कोर्टाच्या हातात आहे असे तपास अधिका-यांनी सांगितले.