शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? तीन पायांच्या बाळाचा जन्म, दैवी चमत्कार समजून लोकांची मोठी गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 13:54 IST

Three Legs Child in Uttar Pradesh : तीन पायांचं बाळ पाहण्यासाठी लोक दूरदूरवरून येत आहेत. सर्वत्र फक्त या बाळाचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. 

गाजीपूर - उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. तीन पाय असलेल्या बाळाचा जन्म झाला आहे. या घटनेने सर्वच हैराण झाले असून बाळाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. अनेकांनी हा दैवी चमत्कार असल्याचं म्हटलं आहे. तर काही जण मुलाच्या पाया पडण्यासाठी घरी मोठी गर्दी करत आहेत. तीन पायांचं बाळ पाहण्यासाठी लोक दूरदूरवरून येत आहेत. सर्वत्र फक्त या बाळाचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या गाजीपूर जिल्ह्यातील तियरा गावात ही घटना घडली आहे. तियरा गावात राहणाऱ्या प्रियंका देवी यांनी 29 सप्टेंबर रोजी तीन पायांच्या बाळाला जन्म दिला. मुलाचा तिसरा पाय त्याच्या गुप्तांगाशी जोडला गेलेला आहे. या पायाला सहा बोटे आहेत. मुलाचं आरोग्य उत्तम असून ते सामान्य बाळासारखं आहे. तीन पायांचं बाळ हा सध्या सर्वत्र कुतुहलाचा विषय झाला आहे.

 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागितली मदत

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाचे वडील विवेकानंद हे गरीब आहेत. या मुलावर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. आपल्या मुलाच्या उपचारासाठी लोकांनी आपल्याला मदत करावी, असं त्यांचं म्हणणे आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे देखील मदत मागितली आहे. सहाय्यक मुख्य वैद्यकीय अधिकारी उमेश कुमार यांनी हा विशिष्ट प्रकारचा आजार असून या आजाराला कंजेनिटल अनोमिली असं म्हणतात अशी माहिती दिली आहे. 

बाळाच्या जन्मानंतर कुटुंबीयांना धक्का

उमेश कुमार यांनी या आजारात रुग्णांवर तपासणीनंतर उपचार होतात अशी माहिती दिली आहे. गरोदर महिला जर रेडिएशनच्या संपर्कात आली किंवा एखाद्या औषधाचा साइड इफेक्ट झाल्यास अशा प्रकारचं मूल जन्माला येतं असं देखील कुमार यांनी म्हटलं आहे. बाळाच्या जन्मानंतर कुटुंबीयांना देखील थोडा धक्का बसला आहे. त्याच्या उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची चिंता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटके