शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी भिडे अज्ञानी, त्यांनी भलतीसलती विधानं करू नयेत; राम मंदिराचे मुख्य पुजारी कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 20:22 IST

राम मंदिरात मिशीवाली मूर्ती बसवण्यात यावी, अशी अपेक्षा संभाजी भिडेंनी व्यक्त केली होती

अयोध्या: अयोध्येत उद्या राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा उद्या संपन्न होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडेंनी अयोध्येतील रामाची मूर्ती मिशीवाली असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. मिशी हे पुरुषत्वाचं प्रतीक आहे. त्यामुळे रामाच्या मूर्तीला मिशी असावी, असं भिडे म्हणाले होते. मात्र अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांनी भिडेंचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. संभाजी भिडेंनी भलतीसलती विधानं करू नयेत, असंदेखील दास म्हणाले.प्रभू राम, लक्ष्मण, हनुमान ही पुरुष दैवतं आहेत. पण राम, लक्ष्मण यांची चित्रं काढताना, त्यांच्या मूर्ती साकारताना चित्रकार, शिल्पकारांनी चूक केली की काय असं माझ्या लक्षात येतं. त्यामुळे राम मंदिरात जी मूर्ती बसवली जाईल, ती मूर्ती मिशीवाली असावी. आतापर्यंत झालेली चूक आपण दुरुस्त करणार नसू, तर मंदिर होऊनही न झाल्यासारखंच आहे, असं संभाजी भिडेंनी म्हटलं होतं.संभाजी भिडेंच्या विधानाचा महंत सत्येंद्र दास यांनी समाचार घेतला आहे. संभाजी भिडे यांनी भलतीसलती विधाने करू नयेत. जर कुठे रामाला मिश्या दाखवल्या गेल्या असतील, तर त्या संभाजी भिडेंसारख्या अज्ञानी लोकांमुळेच, अशा शब्दांत दास यांनी भिडेंवर जोरदार टीका केली. त्यांनी भिडे यांचा उल्लेख अज्ञानी असा केला. प्रभू रामचंद्रांना कोणत्याही मूर्ती किंवा चित्रात मिशी का दाखवली जात नाही, यावरही दास यांनी भाष्य केलं. 'प्रभू राम, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शीव हे हिंदू धर्मातील अतिशय प्रसिद्ध दैवतं आहेत. या तिन्ही देवांना कधीही दाढी किंवा मिशी दाखवलेली नाही. याचं कारण म्हणजे या तिन्ही देवांना षोडशवर्षीय दाखवण्यात आलं आहे. षोडशवर्षीय म्हणजे १६ वर्षीय. हे देव जोपर्यंत पृथ्वीतलावर राहतील, तोपर्यंत ते कायम १६ वर्षीयच राहणार आहेत', असं दास यांनी सांगितलं. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी