शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

साधे राहणीमान असणाऱ्या मुख्यमंत्र्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?; आयकर परतावा भरावा न लागणारे मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 12:02 IST

एखादा मंत्री किंवा अधिकारी सामान्य नागरिकाप्रमाणे वागला की त्यावर मोठी चर्चा होत असते पण सध्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या एका मुख्यमंत्र्यांची साधी राहणी तुम्ही पाहिलीत तर तुम्ही थक्क व्हाल.

ठळक मुद्देसरकार सध्या धनपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याकडे कोणतीही लागवडयोग्य जमिन किंवा घर नसल्याचे त्यांनी नामांकनपत्र भरताना लिहिले आहे, तसेच ते सध्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानात राहात आहेत.

आगरतळा- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं सामान्य नागरिकाप्रमाणे रांगेत उभं राहणं किंवा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा साधा शर्ट याच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो. एखादा मंत्री किंवा अधिकारी सामान्य नागरिकाप्रमाणे वागला की त्यावर मोठी चर्चा होत असते पण सध्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या एका मुख्यमंत्र्यांची साधी राहणी तुम्ही पाहिलीत तर तुम्ही थक्क व्हाल. ईशान्य भारतातात असणाऱ्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सध्या केवळ 3,930 रुपये आहेत आणि आजवर त्यांना कधीही आयकर परतावा भरावा लागलेला नाही.अत्यंत साध्या राहणीत जगणाऱ्या या मुख्यमंत्र्य़ांचे नाव आहे माणिक सरकार. त्रिपुरा राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माणिक सरकार यांना महिन्याला केवळ 5 हजार रुपये पक्षाकडून मिळतात. माणिक सरकार यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरताना आपल्याकडे सध्या  1,520 रुपये असून राष्ट्रीयकृत बँकेत 2,410 रूपये आहेत तसेच इतर कोणत्याही बँकेत आपले खाते नाही असे जाहीर केले आहे. नगरसेवक आमदारांची संपत्ती पाहिल्यावर आजकाल कोट्यवधींचे आकडे समोर येतात. अशा स्थितीत एका मुख्यमंत्र्याची इतकी साधी राहणी नक्कीच विचार करायला लावणारी आहे.सरकार सध्या धनपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याकडे कोणतीही लागवडयोग्य जमिन किंवा घर नसल्याचे त्यांनी नामांकनपत्र भरताना लिहिले आहे, तसेच ते सध्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानात राहात आहेत.माणिक सरकार यांची पत्नी पांचाली भट्टाचार्य या निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे रोख 20,140 रुपये असून तसेच त्यांचे दोन बँक खात्यांमध्ये 1 लाख 24 हजार 101 आणि 86 हजार 473.78 रुपये असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच 2 लाख, 5 लाख आणि 2.25 लाख अशा त्यांच्या तीन कायम ठेवी आहेत व 20 ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांच्याकडे आहेत.पांचाली भट्टाचार्य यांच्याकडे 888.25 स्क्वे .फूट मालकीचा भूखंड असून त्यावर बांधकाम करण्यासाठी त्यांनी आजवर 15 लाख रुपये खर्च केले आहेत. त्या एकूण मालमत्तेची किंमत 21 लाख आहे. पांचाली यांनी शेवटचा कर परतावा 2011-12 साली भरला होता. तेव्हा त्यांनी आपले वार्षिक उत्पन्न 4 लाख 49 हतार 770 इतके जाहीर केले होते, त्यानंतर त्यांनी आयकर परतावा भरलेला नाही.

टॅग्स :Manik Sarkarमाणिक सरकारCommunist Party of India (markjhista)कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्झिस्ट)