शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

​​​​​​​मुख्यमंत्री सुक्खू यांची गच्छंती होणे अटळ; हुड्डा अन् शिवकुमार शिमलामध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 06:54 IST

आमदारांचे मत जाणून घेतल्यानंतर दोन्ही नेते गुरुवारी सायंकाळपर्यंत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आपला अहवाल सादर करतील.

आदेश रावल/ बलवंत तक्षकलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचेहिमाचल प्रदेशमधील सरकार अडचणीत सापडले आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून काँग्रेस नेतृत्वाने हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना सिमल्यात पाठविले आहे.

आमदारांचे मत जाणून घेतल्यानंतर दोन्ही नेते गुरुवारी सायंकाळपर्यंत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आपला अहवाल सादर करतील. कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांनीही बुधवारी सकाळी राजीनामा दिला. मंगळवारी राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर विक्रमादित्य सिंह यांनी पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना फोन करून सांगितले होते की, मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्यासोबत एक दिवसही काम करू शकत नाही.

उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि प्रतिभा सिंह यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे की, आमच्यापैकी कुणाकडेही मुख्यमंत्रिपद दिले तर बंडखोर आमदारही परत येतील. सहा नाराज आमदारांपैकी तीन आमदारांनी प्रभारी राजीव शुक्ला यांना फोन करून सांगितले आहे की, सुखविंदर सिंह सुक्खू यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवा. आम्ही परत येण्यास तयार आहोत. नाराज आमदार हरयाणाच्या पंचकुला येथे आहेत. हरयाणात भाजपचे सरकार आहे.

विक्रमादित्य सिंह यांचा राजीनामा मागे हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. ही माहिती काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाचे निरीक्षक हिमाचल प्रदेशमध्ये दाखल झाले असून त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांशी चर्चा केली. तसेच विक्रमादित्य सिंह यांनी राजीनामा स्वीकारणार नाही असे मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू यांनी स्पष्ट केले होते. विक्रमादित्य सिंह यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी निरीक्षकांनी केलेली सूचना त्यांनी मान्य केली. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशcongressकाँग्रेस