शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये रामनवमीला पहिल्यांदाच सुट्टी जाहीर, भाजप म्हणाले, 'खूप उशीर झाला...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 08:16 IST

पश्चिम बंगाल सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच रामनवमीला सार्वजनिक सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे.

पश्चिम बंगाल सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच रामनवमीला सार्वजनिक सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे, देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असून सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारने हा निर्णय घेतला आहे. या वर्षी रामनवमी १७ एप्रिल रोजी रामनवमी आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या काळात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या हिंसक घटनांसाठी भाजपने थेट ममता बॅनर्जी यांच्या सरकारला जबाबदार धरले. तसेच ममता बॅनर्जी यांच्यावर तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या वर्षी रामनवमीच्या वेळीही हिंसाचार झाला होता.

पंतप्रधान १३ मार्चला उरकणार राज्यांचा दौरा; पुढील आठवड्यात फुंकणार लोकसभेचा बिगुल

पश्चिम बंगाल सरकारच्या या घोषणेवर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, “ममता बॅनर्जी प्रत्येक वेळी ‘जय श्री राम’ ऐकल्या की रागाने लाल व्हायच्या. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये राम नवमीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. आपली हिंदूविरोधी प्रतिमा बदलण्यासाठी त्यांनी हे केले आहे. मात्र, आता खूप उशीर झाला आहे. विशेष म्हणजे रामनवमीच्या मिरवणुकीत दगडफेक होणार नाही याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. जय श्री राम!, असं त्यांनी म्हटले आहे. तृणमूल काँग्रेस आज रविवारी कोलकाता येथील प्रसिद्ध ब्रिगेड परेड ग्राउंडवर एक मोठी रॅली काढणार आहे. या रॅलीने TMC लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. या रॅलीला 'जन गर्जन सभा' ​​असे नाव देण्यात आले आहे. ममता बॅनर्जी या प्लॅटफॉर्मचा वापर आगामी निवडणुकांचा अजेंडा ठरवण्यासाठी करू शकतात. टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जीही या रॅलीला संबोधित करू शकतात.रॅलीपूर्वी शनिवारी संध्याकाळी अभिषेक बॅनर्जी यांनी स्वतः सभास्थळाची पाहणी केली. या रॅलीआधी राज्य सरकाने सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीRam Mandirराम मंदिरBJPभाजपा