शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची ‘गुप्त’ दिल्लीवारी, मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 07:09 IST

गेल्या ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची व देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

सुरेश भुसारीनवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री सर्वांना हुलकावणी देत दिल्लीत दाखल झाले आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून गुरुवारी पहाटे मुंबईला परत गेल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची व देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून मुख्यमंत्री शिंदे यांनी पाचवेळा दिल्लीवारी केली आहे; परंतु मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटलेला नाही. बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल होणार, अशी बातमी दिल्लीत धडकली. काही तासांनंतर मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले; परंतु मुख्यमंत्री शिंदे यांचे बुधवारी रात्री आगमन झाले. विमानतळावर मोजक्या अधिकाऱ्यांशिवाय कुणीही नव्हते.  त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळात किती सदस्य असावे, तसेच मंत्रिमंडळ विस्तार केव्हा करायचा, यावरच चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. माध्यमांना हुलकावणी देण्यासाठी दौरा रद्द झाल्याची बातमी पेरण्यात आल्याचे आता उघड झाले आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे गुरुवारी दुपारी दिल्लीत आगमन झाले. त्यांनी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट घेतली.

दोन-तीन दिवसांत विस्तार - गिरीश महाजनराज्यमंत्रिमंडळाचा विस्तार येत्या दोन-तीन दिवसांतच होईल, असा दावा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. ते सध्या दिल्लीत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात कोणतीही अडचण नसल्याचा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :MumbaiमुंबईEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस