शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सरन्यायाधीशही ‘आरटीआय’च्या कक्षेत? स्वत:च्याच अपिलाची कोर्ट करणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 05:43 IST

सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचे घटनापीठ याच न्यायालयाने नऊ वर्षांपूर्वी दाखल केलेल्या एका अपिलावर येत्या २७ मार्चपासून अंतिम सुनावणी सुरु करणार आहे.

नवी दिल्ली  - सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचे घटनापीठ याच न्यायालयाने नऊ वर्षांपूर्वी दाखल केलेल्या एका अपिलावर येत्या २७ मार्चपासून अंतिम सुनावणी सुरु करणार आहे. सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत येतात का, हा या आपिलात कळीचा मुद्दा आहे.ज्येष्ठ ‘आरटीआय’ कार्यकर्ते सुभाष अगरवाल यांनी केलेल्या अर्जामुळे सुमारे १५ वर्षांपूर्वी या वादाला सुरुवात झाली. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी त्यांच्या व्यक्तिगत मालमत्तांसंबंधीचा जो तपशील सरन्यायाधीशांकडे दिला तो अगरवाल यांनी माहिती अधिकारीत मागितला होता. न्यायालयाच्या माहिती अधिकाऱ्याने ती माहिती देण्यास नकार दिला तेव्हा अगरवाल यांनी उच्च न्यायालयात याचिका केली. एकल न्यायाधीशाने व नंतर अपिलात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने अगरवाल यांच्याबाजूने निकाल दिले व त्यांनी मागितलेली माहिती सर्वोच्च न्यायालयास द्यावी लागेल, असा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालय व सरन्यायाधीश हे ‘आरटीआय’ कायद्यान्वये सार्वजनिक प्राधिकारी आहेत व त्यांना माहिती अधिकार कायदा लागू आहे, असा या निकालांचा निष्कर्ष होता.याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने स्वत:च्याच न्यायालयात केलेले अपील आता २७ मार्चपासून घटनापीठापुढे सुनावणीसाठी येणार आहे. हे अपील सन २०१० मधील आहे. त्यानंतर सहा वर्षांनी सन २०१६ मध्ये न्या. रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा विषय घटनापीठाकडे सोपविण्याची शिफारस केली होती. त्यानुसार न्या. गोगोई आता स्वत: सरन्यायाधीश झाल्यावर त्यांनी त्यासाठी घटनापीठ नेमले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयIndiaभारत