शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

गोध्रा हत्याकांडातील प्रमुख आरोपी फारूख बानाला १४ वर्षांनी अटक

By admin | Updated: May 18, 2016 16:16 IST

संपूर्ण देशाला हादरवणा-या गोध्रा ह्त्याकांडातील प्रमुख आरोपी फारूख बाना याला गुजरात एटीएसने बुधवारी अटक केली.

ऑनलाइन लोकमत

अहमदाबाद, दि. १८ - संपूर्ण देशाला हादरवणा-या गोध्रा हत्याकांडातील प्रमुख आरोपी फारूख बाना याला गुजरात दहशतवाद विरोध पथकाने ( एटीएस) बुधवारी सकाळी अटक केली. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा स्टेशनवर साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्यात आली होती, त्यामध्ये ५९ प्रवासी जळून खाक झाले होते.  १४ वर्षांपूर्वी झालेल्या या जळीतकांडानंतर संपूर्ण गुजरातमध्ये  जातीय दंगली पेटल्या होत्या, ज्यामध्ये हजारो निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यामध्ये बव्हंशी अल्पसंख्याकांचा समावेश होता. 
 
या जळीतकांडामागचा प्रमुख सूत्रधार असणा-या फारूख बाना हा गोध्रा महापालिकेतील माजी नगरसेवक असून गुजरात एटीएसने बुधवारी त्याला पंचमहल जिल्ह्यातील कालोल येथून बेड्या ठोकल्या.अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार भाना या कटाचा मुख्य सूत्रधार होता. गोध्रा रेल्वे स्थानकाजवळच्या फूलन बाजारातील अमन गेस्ट हाऊसमध्ये त्याने बैठक घेतली होती. साबरमती एक्सप्रेस रात्री दोनऐवजी सकाळी सात वाजता येणार असल्याचे त्याने सांगितले होते. ट्रेनला आग लावण्यासाठी त्याने १४० लिटर पेट्रोलचीही व्यवस्था केली होती अशी माहिती एटीएसच्या अधिका-यांनी दिली. 
 
भानाला सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या एसआयटीच्या हवाली सुपूर्द केले जाणार आहे. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा स्थानकावर आलेल्या साबरमती एक्सप्रेसच्या एस-६ डब्ब्याला जमावाने आग लावली होती. त्यात ५९ कारसेवकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये जातीय दंगलीना सुरुवात झाली होती. २०११ मध्ये याप्रकरणात विशेष न्यायालयाने ३१ आरोपींना दोषी ठरवले आणि ६३ जणांची निर्दोष सुटका केली. ११ जणांना न्यायालयाने मृत्यूदंडाची तर, २० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 
 
दरम्यान जानेवारी महिन्यातच अहमदाबाद एटीएसने या जळीतकांडातील एक संशयित आरोपी अबरार पठाण ( वय .४८, उत्तरप्रदेश) याला पालघरमधून अटक केली होती. गुजरातमध्ये २००२मध्ये घडलेल्या गोध्रा हत्याकांडातील तो संशयीत आरोपी होता. गुजरात दहतवादी विरोधी पथक अनेक वर्षांपासून त्याच्या मागावर होते. २३ जानेवारी रोजी आरोपी अबरार हा सिडको औद्योगिक वसाहतीमधील ड्युरिअन या लाकडी फर्निचर बनविणाऱ्या कंपनीमधील माल आपल्या ट्रकमध्ये भरीत असताना अहमदाबादच्या दहशतवादी विरोधी पथकाने त्याच्यावर झडप घालून त्याला अटक केली. उत्तरप्रदेश राज्यातील वाराणशीजवळील पिंडासे गावातील हा आरोपी अनेक वर्षांपासून पालघरमध्ये एकटाच राहत होता.