शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागात मुख्य निवडणूक आयुक्तांची पायपीट, जाणून घेतल्या निवडणूक यंत्रणेसमोरील अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 05:35 IST

chamoli in uttarakhand : राजीवकुमार यांनी अतिदुर्गम गावांचा दौरा केला त्याच दिवशी शुक्रवारी चंपावत विधानसभा मतदारसंघातील  पोटनिवडणुकीचाही निकाल लागणार होता.

चामोली : उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात अतिदुर्गम भागातील डुमक व कलगोठ या  दोन गावांमध्ये मतदान केंद्रे उभारताना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार शुक्रवारी डोंगराळ प्रदेशातून १८ किमी पायपीट करीत त्या परिसरात पोहोचले. त्यांच्या या प्रयत्नांचे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.राजीवकुमार यांनी सांगितले की, उत्तराखंडमध्ये कोणत्याही निवडणुकांच्या वेळी डुमक व कलगोठ येथे मतदान केंद्रे उभारण्यासाठी कर्मचारी, तसेच सुरक्षा जवानांना तिथे पोहोचण्याकरिता तीन दिवस पायी चालत प्रवास करावा लागतो. इतक्या दुर्गम भागात निवडणुकांची पूर्वतयारी करणे हे एक प्रकारचे आव्हान आहे. या गोष्टी समजून घेण्यासाठी मी या दोन गावांना भेट दिली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी दौरा केलेली डुमक व कलगोठ गावे बद्रीनाथ विधानसभा मतदारसंघामध्ये येतात.राजीवकुमार यांनी अतिदुर्गम गावांचा दौरा केला त्याच दिवशी शुक्रवारी चंपावत विधानसभा मतदारसंघातील  पोटनिवडणुकीचाही निकाल लागणार होता. या पोटनिवडणुकीत उत्तराखंडचे विद्यमान मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे ५५ हजार मतांनी विजयी झाले. उत्तराखंडमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपचा विजय झाला असला तरी त्यावेळी पुष्करसिंह धामी यांचा पराजय झाला होता. मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी पुन्हा निवडणुकीत विजय मिळविणे धामी यांच्याकरिता आवश्यक होते. (वृत्तसंस्था)

आणखी गावांचा दौरा करणारमुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, देशातील आणखी काही अतिदुर्गम भागातील गावांना मी भविष्यात भेट देणार आहे. या भागांमध्ये निवडणूक यंत्रणेला येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील याचा विचार निवडणूक आयोग करणार आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडElectionनिवडणूक