शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

चिदम्बरम यांची सीबीआय चौकशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:53 IST

अर्थमंत्री असताना पी. चिदम्बरम यांनी २0१३ साली सोने आयातीची जी ८0-२0 योजना आणली होती, तिला महसूल गुप्तचर संचालनालयाचा (डीआरआय) विरोध होता, असे संसदेच्या लोकलेखा समितीच्या उपसमितीला आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी शिफारस ही समिती करू शकेल, असे सांगण्यात येत आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली - अर्थमंत्री असताना पी. चिदम्बरम यांनी २0१३ साली सोने आयातीची जी ८0-२0 योजना आणली होती, तिला महसूल गुप्तचर संचालनालयाचा (डीआरआय) विरोध होता, असे संसदेच्या लोकलेखा समितीच्या उपसमितीला आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी शिफारस ही समिती करू शकेल, असे सांगण्यात येत आहे.या योजनेमुळे काळा पैसा व मनी लाँड्रिंगला चालना मिळेल, असे डीआरआयने अर्थ मंत्रालयाला सांगितले होते. तरीही पी. चिदम्बरम यांनी ही योजना आणली, अशी माहिती या उपसमितीपुढेआल्याचे एका सदस्याने सांगितले. भाजपाचे खा. निशिकांत दुबे या उपसमितीचे अध्यक्ष आहेत. या उपसमितीपुढे डीआरआय, सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) व सेंट्रल बोर्ड आॅफ एक्साइज अँड कस्टम्स (सीबीईसी) चे अधिकारीही हजर झाले होते. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी शिफारस करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.शिवाय आयएनएक्स मीडियाच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कार्ती चिदम्बरम अटकेत असतानाच पी. चिदम्बरम यांना संकटांचा सामना करावा लागेल, असे दिसत आहे. ईडी व सीबीआय यांनी जे पुरावे एकत्र केले आहेत, त्याआधारे चिदम्बरम यांना आधी चौकशीला बोलावण्यात येईल आणि कदाचित पुढील कारवाई होईल,अशी शक्यता व्यक्त होत आहे.आपण आधी चिदम्बरम यांच्या सांगण्यावरून कार्ती यांना भेटलो व त्यांना फीच्या रूपात १0 लाख डॉलर्स दिले, असे इंद्राणी मुखर्जीने दंडाधिकाºयांना दिलेल्या जबाबात म्हटल्याचा दाखला दिला जात आहे. फी दिल्यानंतरच आयएनएक्स मीडियाचे काम झाले, असा आरोप आहे.कार्ती यांच्या जामिनावर उद्या, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, कार्तीची बाजू मांडण्यासाठी कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी असे अनेक वरिष्ठ कायदेतज्ज्ञ उभे राहणार आहेत. त्यांना जामीन मिळू नये, यासाठी सीबीआय व ईडी प्रयत्नशील आहे. आपल्या मुलाला जाणीवपूर्वक व त्रास देण्यासाठीच अडकवले जात आहे, असा चिदम्बरम यांचा आरोप आहे.आयएनएक्स मीडियाच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कार्ती चिदम्बरम अटकेत असतानाच माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना संकटांचा सामना करावा लागेल, असे दिसत आहे.नार्को टेस्टसाठी न्यायालयाकडे अर्जआयएनएक्स मीडिया मनी लाँड्रिंगप्रकरणी कार्ती चिदम्बरम यांची नार्को टेस्ट करण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज सीबाआयने विशेष न्यायालयाकडे केला आहे.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमPoliticsराजकारणIndiaभारतCorruptionभ्रष्टाचार