शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

हा तर घोडे पळाल्यानंतर तबेला बंद करण्याचा प्रकार, आधारच्या व्हर्च्युअल आयडीवर चिदंबरम यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 19:44 IST

आधारच्या सुरक्षेसाठी ‘यूएडीएआयडी’ने मांडलेली आभासी ओळख क्रमांकाची (व्हर्च्युअल आयडी) संकल्पनेवर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे.

नवी दिल्ली - दुरुपयोग होण्याचा धोका टाळण्यासाठी ‘आधार’धारकांना आता एकदाच वापरता येईल, असा आभासी सांकेतिक क्रमांक (व्हर्च्युअल आयडी) देण्याची नवी सोय ‘युनिक आयडेन्टिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ सुरू करणार आहे. आधारच्या सुरक्षेसाठी ‘यूएडीएआयडी’ने मांडलेली आभासी ओळख क्रमांकाची (व्हर्च्युअल आयडी) संकल्पनेवर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. हा तर घोडे पळाल्यानंतर तबेला बंद करण्याचा प्रकार असल्याची खोटक टीका त्यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे. सरकारने सक्ती केल्यामुळे आतापर्यंत लाखो नागरिकांनी यापूर्वीच आपल्या आधार कार्डाचा नंबर सेवा पुरवठादारांना दिला आहे. त्यामुळे आता आधारची माहिती गोपनीय राखण्यासाठी नव्याने सुरक्षा कवच पुरविण्याचा प्रकार म्हणजे ‘घोडे पळाल्यानंतर तबेला बंद करण्याचा प्रकार, असल्याची टीका चिदंबरम यांनी केली. आता केंद्र सरकार या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आधारचा डेटा सुरक्षित नसल्याचा दावा माध्यमांतील वृत्तांमधून करण्यात आल्यानंतर आधारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. 

मोबाइलचे सिमकार्ड संलग्न करणे किंवा अन्य कारणांसाठी ‘आधार’ क्रमांक दिल्यावर त्या व्यक्तीची सर्व माहिती त्रयस्थाच्या हाती पडून तिचा दुरुपयोग होण्याचा धोका टाळण्यासाठी ‘आधार’धारकांना आता एकदाच वापरता येईल, असा आभासी सांकेतिक क्रमांक (व्हर्च्युअल आयडी) देण्याची नवी सोय ‘युनिक आयडेन्टिफिकेशन अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’ सुरू करणार आहे.यामुळे आपला ‘आधार’ क्रमांक न उघड करता ‘व्हर्च्युअल आयडी’ क्रमांक देऊन गरज भागविण्याचा अधिक सुरक्षित पर्याय मिळेल. ‘व्हर्च्युअल आयडी’ कोणत्याही क्रमवारीविना तयार झालेला १६ अंकी आकडा असेल. त्यावरून मोबाइल कंपनी किंवा अन्य सेवा पुरवठादारांना त्या व्यक्तीचे नाव, पत्ता व छायाचित्र अशी त्या कामासाठी पुरेशी ठरणारी माहिती उपलब्ध होईल. आधारधारकांना ‘यूआयडीएआय’च्या वेबसाइटवरून असा ‘व्हर्च्युअल आयडी’ तयार करून घेता येईल. हा ‘व्हर्च्युअल आयडी’ एकदा वापरला, की त्याची उपयुक्तता संपुष्टात येईल. त्यामुळे प्रत्येक वेळी वापर करताना नवा ‘व्हर्च्युअल आयडी’ घ्यावा लागेल.१ जूनपासून नवी सोय‘यूआयडीएआय’च्या वेबसाइटवरून असा ‘व्हर्च्युअल आयडी’ ‘जनरेट’ करण्याची सोय १ मार्च २०१८ पासून सुरू होईल.केवायसी व ‘आधार’ संग्लनतेचे अधिकार दिलेल्या सर्व सेवा पुरवठादारांना १ जून २०१८ पासून अशा ‘व्हर्च्युअल आयडी’च्या आधारे काम करणे सक्तीचे असेल.थोडक्यात याचे स्वरूप ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) सारखे असेल. ‘आधार’धारक लागेल त्या त्या वेळेला व कितीही वेळा नवा ‘व्हर्च्युअल आयडी’ मिळवू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.सेवा पुरवठादारास‘व्हर्च्युअल आयडी’ वहाताच्या बोटाचे ठसे दिलेकी त्याचे काम भागेल‘आधार’धारकासच

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डP. Chidambaramपी. चिदंबरम