शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

अंडरवर्ल्डमध्ये फूट; वेगळे झाले दाऊद आणि छोटा शकील, गुप्तचर यंत्रणेच्या सुत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 12:27 IST

गेल्या कित्येक वर्षापासून सोबत असणाऱ्या अंडरर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम व छोटा शकील वेगळे झाल्याचं वृत्त आहे.

ठळक मुद्देगेल्या कित्येक वर्षापासून सोबत असणाऱ्या अंडरर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम व छोटा शकील वेगळे झाल्याचं वृत्त आहे. शकील आणि दाऊदचे रस्ते आता वेगळे झाले आहेत.

मुंबई- गेल्या कित्येक वर्षापासून सोबत असणाऱ्या अंडरर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम व छोटा शकील वेगळे झाल्याचं वृत्त आहे. भारताच्या गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्याच्या सुत्रांकडून ही माहिती मिळते आहे. अधिकाऱ्याच्या माहितीनुसार,शकील आणि दाऊदचे रस्ते आता वेगळे झाले आहेत. शकील जवळपास 1980 साली मुंबई सोडल्यानंतर दाऊदकडे कराचीच्या रेडक्लिफ भागात राहत होता. पण आता शकीलने स्वतःचा ठिकाणा बदलला असून तो कुठे आहे ? याबद्दलची माहिती कोणालाही नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

दाऊद आणि शकीलचं वेगळं होण्याचा कारण त्या दोघांमध्ये नुकतीच झालेली भांडण असू शकतं, अशी शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे. शकील हा दाऊदच्या सगळ्यात जवळच्या लोकांपैकी एक असून तो गेल्या तीन दशकांपासून त्याच्यासोबत राहतो आहे. दाऊद व शकील दोघांनी मिळून गँग चालविली होती. शकीलचं वय सध्या जवळपास 50 इतकं असेल. शकील व दाऊद या दोघांमध्ये नुकतंच दाऊदचा लहान भाऊ अनीसचा गँगच्या कारभारातील हस्तक्षेपामुळे वाद झाले होते. त्याच वादामुळे शकील वेगळा झाल्याचं बोललं जातं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, अनीस पाकिस्तानात दाऊदबरोबरच राहतो. याआधीही त्याने गँगच्या कामात हस्तक्षेप करून दाऊदच्या जवळ जाण्याचे प्रयत्न केले होते. दाऊदने नेहमीच त्याच्या भावांना गँगमध्ये दखल न देण्याचा सल्ला दिला होता. नुकत्याच झालेल्या एका बैठकीमध्ये दाऊद व शकीलमध्ये अनीसच्या मुद्द्यावरून वादावादी झाली. या बैठकीत दाऊदने शकीलाल गँगपासून लांब राहण्यास सांगितलं व दुबईमध्ये त्याने काही खास लोकांबरोबर बैठक केली. दुसरीकडे शकीलनेही पूर्व आशियाई देशात त्याच्या खास व्यक्तींबरोबर बैठक केली आहे. 

दाऊद आणि छोटा शकील यांच्यात फूट पडल्याची बातमी आल्याने पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणाही सावध झाल्या आहेत. मुंबई, दुबई आणि पाकिस्तान या ठिकाणी डी गँगच्या काही मोजक्या लोकांनाच दाऊद आणि छोटा शकील यांच्यात झालेल्या वादाची माहिती आहे. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात दाऊदचा हात होता. तसेच छोटा शकीलही या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. डी गँगपासून छोटा शकीलने फारकत घेतल्यामुळे आता एकाच गँगच्या दोन टोळ्या आणि त्यातील नवा वाद समोर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 

दाऊद व शकील वेगळे होणं अशक्य आहे. दाऊदचा भाऊ त्याला सोडून वेगळा होऊ शकतो पण शकील असं करणं अशक्य आहे. शकील आयुष्यभर दाऊदशी प्रामाणिक राहणारा आहे. पण जर त्या दोघांमध्ये काही मतभेत झाले असतील तर ते फक्त अनीसमुळे झालेले मतभेद असतील, अशा प्रतिक्रिया येत आहेत. 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिम