शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; खांद्यावर मृतदेह ठेवून बाप १० किमी चालला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 13:11 IST

नर्सनं दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा करण्यात आला आरोप. आरोग्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश.

Chhattisgarh News:  छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यात एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथील शासकीय रुग्णालयात ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानंतर वडील रुग्णवाहिकेसाठी विनवणी करत राहिले, मात्र त्यांना रुग्णवाहिका मिळालीच नाही. जेव्हा त्यांना रुग्णवाहिका मिळाली नाही तेव्हा वडिलांनी आपल्या मुलीचा मृतदेह खांद्यावर ठेवला आणि १० किमी चालत आपल्या घरी पोहोचले. आपल्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयातील नर्सवर मोठा आरोप करण्यात आला आहे. चुकीचे इंजेक्शन दिल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. हे प्रकरण समोर आल्यानंतर निर्माण झालेला वाद पाहता आरोग्यमंत्री टीएस सिंहदेव यांच्या सूचनेनुसार बीएमओ हटवण्यात आले. तसंच आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश दिले आहे. याबाबत आरोग्यमंत्र्यांनीही ट्वीट केलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लखनपूर ब्लॉक येथील आहे. ईश्वर दास हे येथील अमदला गावचे रहिवासी आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या मुलीची प्रकृती बिघडली होती. तिचा तापही उतरत नव्हता. हे पाहून कुटुंबीयांनी मुलीला घेऊन शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लखनपूर आरोग्य केंद्र गाठलं. परंतु या ठिकाणी उपचार सुरू असताना मुलीचा मृत्यू झाला. मुलीचा मृतदेह नेण्यासाठी नातेवाईकांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडे रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, बराच वेळ प्रतीक्षा करूनही त्यांना रुग्णवाहिका मिळाली नाही.

वडिलांनी सांगितली आपबितीजेव्हा रुग्णवाहिकेबाबत कोणतीही व्यवस्था होऊ शकली नाही तेव्हा वडील ईश्वर दास यांनी मुलीचा मृतदेह खांद्यावर उचलला आणि घराकडे निघाले. सुमारे दहा किलोमीटर चालत त्यांनी आपलं घर गाठवं. माध्यमांनी ईश्वर दास यांना विचारले असता त्यांनी संपूर्ण परिस्थिती सांगितली. मुलीचा मृतदेह नेण्यासाठी जेव्हा रुग्णवाहिकेची विचारणा केली तेव्हा रुग्णालय व्यवस्थापनानं टाळाटाळ केल्याचे ते म्हणाले. नर्सने आपल्या मुलीला चुकीचे इंजेक्शन दिले. यानंतर तिच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि तिचा मृत्यू झाला, असा आरोपही त्यांनी केला.

आरोग्यमंत्र्यांकडून दखलया प्रकरणाची आरोग्य मंत्री टीएस सिंहदेव यांनी दखल घेत ट्वीटही केलं. यात दिसणारी दृश्ये दुर्दैवी आहेत आणि संभाव्य उपचारानंतर या मुलीचा मृत्यू होणे अत्यंत दुःखद आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल आणि जे आपल्या कर्तव्यांचं पालन करण्यात सक्षम नाहीत, त्यांची जबाबदारी अन्य व्यक्तीकडे सोपवली जाईल असंही ते म्हणाले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलIndiaभारत