शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा तेच! नक्षलवाद्यांनी घडवून आणला IED स्फोट, CRPF कोबरा यूनिटचे 2 जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:22 IST

Chhattisgarh IED Blast :काही दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांच्या स्फोटात 8 जवानांना वीरमरण आले होते.

Chhattisgarh IED Blast : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपवण्याची घोषणा केली आहे. पण, अजूनही छत्तीसगमध्ये नक्षलवादी कारवाया सुरुच आहेत. काही दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात आठ जवान शहीद झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. 

दोन जवान जखमीयाबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ही घटना बासागुडा पोलीस स्टेशन परिसरात पहाटे घडली. या घटनेत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कोब्रा युनिटचे दोन कमांडो जखमी झाले आहेत. कॉन्स्टेबल मृदुल बर्मन आणि मोहम्मद इशाक, असे जखमी जवानांची नावे आहेत. घटनेनंतर त्यांच्यावर बासागुडा सीआरपीएफ कॅम्पमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. सध्या दोन्ही जवानांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पुढील उपचारासाठी त्यांना राज्याची राजधानी रायपूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

नक्षलवाद्यांनी IED पेरलेनक्षलग्रस्त बस्तर भागात गस्त घालणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना टार्गेट करण्यासाठी माओवादी अनेकदा रस्त्यांवर आणि जंगलातील पाऊल वाटांवर IED पेरतात. बस्तर प्रदेशात विजापूरसह 7 जिल्हे आहेत. या भागातील लोक अनेकदा नक्षलवाद्यांनी पेरलेल्या स्फोटकांत मरण पावतात. 12 जानेवारी रोजी सुकमा जिल्ह्यात अशाच स्फोटात 10 वर्षांची मुलगी जखमी झाली होती. 

आठ जवान शहीदयाच महिन्यात, 6 जानेवारी रोजी नक्षलवाद्यांनी विजापूरमध्ये आयईडीद्वारे जवानांचे वाहन उडवले होते. त्या घटनेत 8 पोलीस कर्मचारी आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला होता. ही भीषण घटना कुटरू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अम्बेली गावाजवळ घडली. सुरक्षा जवान नक्षलविरोधी ऑपरेशननंतर आपल्या स्कॉर्पिओ वाहनाने परतत असताना नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. गेल्या दोन वर्षांतील सुरक्षा जवानांवरील नक्षलवाद्यांचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादीCrime Newsगुन्हेगारी