शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सात तासांत तब्बल १०१ महिलांची नसबंदी; राज्य सरकार हैराण, डॉक्टरांच्या चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 23:04 IST

सात तासांमध्ये तब्बल १०१ महिलांवर नसबंदीची सर्जरी करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.

देशात अनेकविध घटना घडत असतात. काही घटनांमुळे सगळेच जण हैराण होतात. एका राज्यातही अशीच एक घटना घडली आहे. सात तासांमध्ये तब्बल १०१ महिलांवर सर्जरी करण्यात आली. हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. यासंदर्भात अखेर सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. एका सरकारी नसबंदी शिबिरात हा प्रकार घडला आहे. (chhattisgarh govt order probe on sterilization of 101 women in seven hours)

Parle-G बनवणाऱ्या कंपनीविरोधात स्पर्धा आयोगाकडे तक्रार; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यात असलेल्या नर्मदापूर गावात आयोजित नसबंदी शिबिरात एका सर्जनने सात तासात १०१ महिलांवर सर्जरी केली, अशी माहिती एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. स्थानिक वृत्तपत्रांनी या शिबिरामध्ये अनागोंदी कारभार सुरु असल्याचे वृत्त दिले होते. यानंतर आरोग्य विभागाने याची दखल घेत सर्जन आणि स्थानिक आरोग्य अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

“मी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही”; खुद्द रतन टाटांनीच केली फेक न्यूजची पोलखोल

तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येईल

सुरगुजा जिल्ह्यातील नर्मदापूर गावात सदर शिबीर आयोजित करण्यात आले होते. तक्रारींची दखल घेत तपास सुरु करण्यात आला आहे. तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण योजनेचे मुख्य सचिव डॉक्टर अशोक शुक्ला यांनी दिली. सरकारी सर्जनने एकूण १०१ सर्जरी केल्या. ज्या महिलांवर सर्जरी करण्यात आली त्यांची स्थिती सामान्य असल्याचे सांगितलं जात आहे. पण सरकारी नियमांनुसार, सर्जन दिवसात ३० सर्जरीच करु शकतात. नियमांचे पालन का केले नाही, याची माहिती घेण्यासाठी चौकशीचा आदेश देण्यात आला आहे, असे डॉ. शुक्ला यांनी सांगितले.

“आम्हाला अडवू नका, परिणाम चांगले होणार नाहीत”; राकेश टिकैत यांचा थेट इशारा

दरम्यान, मोठ्या प्रमाणात महिला आल्या होत्या आणि त्यांनी आपल्याला सर्जरीसाठी विनंती केली, असा दावा सर्जनने केला आहे. यासंदर्भात तीन सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली असून, चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर कोणी दोषी आढळले तर कठोर कारवाई केली जाईल, असे एका वरिष्ठ डॉक्टरांकडून सांगण्यात आले. यापूर्वी, सन २०१४ मध्ये बिलासपूर जिल्ह्यात एका नसबंदी शिबिरात एका दिवसांत ८३ महिलांची नसबंदी करण्यात आली होती. यातील १३ महिलांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडState Governmentराज्य सरकार