शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; 25 लाखांच्या इनामी नक्षलवाद्यासह 3 ठार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 18:01 IST

Chhattisgarh Naxal Encounter: गेल्या 83 दिवसांत 100 हून अधिक कट्टर नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

Chhattisgarh Naxal Encounter: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 31 मार्च 2026 पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याची घोषणा केली आहे. गृहमंत्र्यांच्या घोषणेनुसार, छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची तीव्र कारवाई सुरू आहे. मंगळवारी दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाले. यामध्ये 25 लाखांचे बक्षीस असलेल्या सुधीर उर्फ ​​सुधाकर उर्फ ​​मुरली याचाही समावेश आहे. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरुन इंसास रायफल, 303 रायफलसह मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त केला. सध्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

पोलिस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितले की, दंतेवाडा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या गीडाम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गिरसापारा, नेलगोडा, बोडगा आणि इकेली या सीमावर्ती भागात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर डीआरजी आणि बस्तर फायटरच्या पथकाने शोधमोहीम राबवली. यावेळी सुरक्षा दलांना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

यानंतर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तीन नक्षलवादी जागीच ठार झाले. त्यातील एकाचे नाव सुधीर उर्फ ​​सुधाकर उर्फ ​​मुरली असे असून, त्याच्यावर 25 लाखांचे बक्षीस होते. अन्य दोन नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे. चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य आणि दैनंदिन वापरातील वस्तू सापडल्या आहेत.

सुरक्षा दलांची मोठ्या प्रमाणात कारवाईबस्तरचे पोलिस महानिरीक्षक श्री सुंदरराज पी. यांनी सांगितले की, सरकारच्या सूचनेनुसार, DRG, STF, बस्तर फायटर्स, कोब्रा, CRPF, BSF, IDBP आणि CAF यांची संयुक्त टीम लोकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण परिसरात सतत सक्रिय आहे. गेल्या 83 दिवसांत 100 हून अधिक कट्टर माओवाद्यांना विविध कारवाईत ठार करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यातच छत्तीसगडमधील बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठा हल्ला केला आणि दोन वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये 22 नक्षलवाद्यांना ठार केले. या कारवाईत एक जवानही शहीद झाला होता. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादीCrime Newsगुन्हेगारी