शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! लाँग ड्राईव्हला गेलेल्या डॉक्टरचं प्रेयसीसोबत भांडण; 50 लाखांच्या मर्सिडीजला लावली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 16:23 IST

रागाच्या भरात एका डॉक्टरने तब्बल 50 लाख रुपये किमतीची मर्सिडीज बेंझ कार पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

राग हे विनाशाचे लक्षण आहे असे म्हणतात. जेव्हा राग येतो तेव्हा माणूस नेहमीच नुकसान करतो. अशीच एक धक्कादायक घटना तामिळनाडूच्या चेन्नईतील कांचीपुरममधून समोर आली आहे. रागाच्या भरात एका डॉक्टरने तब्बल 50 लाख रुपये किमतीची मर्सिडीज बेंझ कार पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

कांचीपुरममध्ये एका डॉक्टरचे त्याच्या प्रेयसीसोबत भांडण झालं. त्यानंतर डॉक्टरने त्याची मर्सिडीज बेंझ कार पेटवून दिली. मोकळ्या मैदानात रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, धर्मपुरी येथील रहिवासी असलेल्या कविनने गेल्या वर्षी कांचीपुरम येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केले असून तो एका खासगी रुग्णालयात काम करतो.

50 लाखांच्या मर्सिडीज बेंझ कारमधून फिरायला गेले अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काव्या आणि कविन यांची कॉलेजपासूनची मैत्री होती. तेव्हापासून काव्या त्याची गर्लफ्रेंड होती. सध्या ती एका खासगी क्लीनिकमध्ये काम करते. गुरुवारी रात्री कविनने काव्याला तिच्या 50 लाखांच्या मर्सिडीज बेंझ कारमधून फिरायला आणलं. त्यानंतर दोघेही कांजीपुरम जिल्ह्यातील राजाकुलम तलावाजवळील निर्जन भागात गेले.ट

कार पूर्णपणे जळून खाक 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचे तिथे भांडण झाले. त्यानंतर कविनने रागाच्या भरात कारवर पेट्रोल टाकून आग लावली. गाडीला आग लागल्याचे पाहून रस्त्यावरून जाणाऱ्यांनी अग्निशमन दल आणि बचाव दलाच्या कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती दिली. कांचीपुरम पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. सध्या पोलिसांनी कविनची जामिनावर सुटका केली आहे. कार पूर्णपणे जळून खाक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"