चेन्नई : येथील पोरूर या उपनगरात बांधकाम सुरू असलेली एक इमारत कोसळून झालेल्या अपघातातील बळींची संख्या 18 झाली आहे. या इमारतीच्या ढिगा:यातून सोमवारी एका महिलेला जिवंत बाहेर काढण्यात जवानांना यश मिळाले.
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे अधिकारी एस.पी. सेलवन यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात ठार झालेल्यांची संख्या 18 झाली आहे. पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत असल्याचेही त्यांनी सांगितले. सकाळी या इमारतीच्या ढिगा:यातून एका महिलेला जिवंत बाहेर काढण्यात यश आले. आंध्र प्रदेशच्या विजयानगरमची असलेल्या मीनाम्मल या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही इमारत शनिवारी सकाळी कोसळली होती. ढिगा:याखाली 5क् जण दबले असल्याची शक्यता असून इमारतीच्या मालकासह सहा लोकांना अटक करण्यात आली आहे.
अपघातातील आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेल्या मृतांच्या कुटुंबियांना आंध्र प्रदेश सरकारने पाच लाख रुपये घोषित केले आहेत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी याआधीच मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत घोषित केली होती. (वृत्तसंस्था)