शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

'शिवाजीः द बॉस'... लैंगिक छळापासून महिलेला वाचवण्यासाठी 'त्यानं' धावत्या ट्रेनमधून घेतली उडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 16:24 IST

वरिष्ठांनी ५ हजार रुपयांचं बक्षीस देऊन त्याचा गौरव केला.

चेन्नईः एखाद्या व्यक्तीचा जीव जात असतानाही लोक सेल्फी काढत बसल्याचे प्रकार हल्ली घडतात. माणुसकी हरवत चालल्याचं हे दुर्दैवी चित्र अस्वस्थ करून जातं. पण, रेल्वे सुरक्षा बलातील एका संवेदशनील कॉन्स्टेबलनं, २५ वर्षीय महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी धावत्या ट्रेनमधून उडी घेतल्याची घटना चेन्नईत घडली आहे. के शिवाजी असं त्याचं नाव असून त्यानं केलेला पराक्रम नावाला शोभणारा - शिवाजीसारखाच असल्याचं कौतुक सोशल मीडियावर होतंय.के शिवाजी एका उपनिरीक्षकासोबत सोमवारी रात्री पेट्रोलिंगवर होते. एमआरटीएस ट्रेनमधून वेलाचेरी ते चेन्नई बीच असा प्रवास करत असताना, त्यांना महिलेचा आरडाओरडा ऐकू आला. महिलांच्या डब्यात काहीतरी गडबड असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पण, ट्रेननं नुकतंच स्टेशन सोडलं होतं. डबे एकमेकांना जोडलेले नसल्यानं त्या डब्यात तात्काळ पोहोचणं शक्य नव्हतं. शिवाजी अस्वस्थ झाले होते. पुढच्या पार्क टाउन स्टेशनवर गाडी थांबायच्या आधीच त्यांनी प्लॅटफॉर्मवर उडी मारली आणि महिला डब्याकडे धाव घेतली. महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला दूर ढकललं आणि महिलेची सुटका केली. त्यानंतर, रेल्वे पोलिसांनी २६ वर्षीय एस सत्यराजला अटक केली. आता त्याची रवानगी कोठडीत करण्यात आलीय. दरम्यान, या धक्क्यानं हादरलेली महिला सुटकेनंतर बेशुद्धच पडली. तिच्या ओठांतून रक्त येत होतं आणि कपडेही फाटले होते. शिवाजी आणि अन्य पोलिसांनी तिला तातडीने राजीव गांधी सरकारी रुग्णालयात नेलं. तिथे उपचारांनंतर तिची प्रकृती स्थिर आहे. जीआरपी प्रमुख पॉन मॅनिकाव्हेल यांनी पीडित महिलेची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. तेव्हा, आपलं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवल्याबद्दल तिनं शिवाजी यांचे आभार मानले. शिवाजी यांच्या या कामगिरीचं सर्वच स्तरांतून कौतुक होतंय. वरिष्ठांनी ५ हजार रुपयांचं बक्षीस देऊन त्याचा गौरव केला. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळRapeबलात्कार