शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल विविध कामांचा जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 05:49 IST

मोदी सरकारची नऊ वर्षे पूर्ण होण्याची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सरकारच्या १०० मोठ्या कामांवर एक पुस्तिकाही तयार करण्यात आली आहे.

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असून, अयोध्येतील राम मंदिर, कलम ३७०, तीन तलाक, सर्जिकल स्ट्राईकपासून ते कोरोना लसीपर्यंत मोदी सरकारच्या कामांचा देशभरात जयघोष करण्याची तयारी सुरू झाली आहे. देशातील सर्व जिल्ह्यांत मोदी सरकारच्या कामांवर तयार केलेली पुस्तिका पाठविली जाईल व प्रत्येक जिल्ह्यात याबाबत एक पत्रकार परिषदही घेण्यात येईल.

मोदी सरकारची नऊ वर्षे पूर्ण होण्याची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सरकारच्या १०० मोठ्या कामांवर एक पुस्तिकाही तयार करण्यात आली आहे. २५, २६ मे रोजी या पुस्तिकेवर माध्यमांना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखविण्यात येणार आहे. नऊ वर्षांत भारत किती बदलला आहे, देश कोठून कोठे पोहोचला आहे, जगात भारताची ताकद व मान किती वाढला आहे, हे सर्व यात सांगितले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर २०२४ साठी कोणीही तोडीस तोड नाही, हे दाखविण्यासाठी हा सर्व प्रयत्न आहे. त्याचबरोबर कर्नाटकच्या पराभवाचा भाजप व मोदींना काहीही फरक पडणार नाही, हेही सांगितले जाणार आहे. 

मोदी सरकारचे सर्व मंत्री, भाजपचे सर्व नेते, खासदार जनतेमध्ये जाणार आहेत व ही कामे सांगणार आहेत. मोदी सरकारच्या याच कामांच्या उपलब्धींवर २०२४ मध्ये भाजप निवडणूक लढवणार आहे. देशभरात पत्रकार परिषदा, जनसंवाद, सेमिनार, जाहीर सभा हाेतील. एकूणच ही सर्व तयारी नऊ वर्षांची कामे सांगण्यापेक्षा २०२४ च्या तयारीसाठी असल्याचे जास्त दिसते.

या मुद्द्यांवर लढविणार निवडणूक  मोदी सरकारच्या ज्या मोठ्या कामांवर २०२४ ची निवडणूक लढविली जाणार आहे, त्यात अयोध्येतील राम मंदिर, काश्मीरमधील कलम ३७० हटविणे, पाकिस्तानविरोधात सर्जिकल स्ट्राईक, कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकणे, कोरोना लस भारतात तयार करणे, ८० कोटी लोकांना मोफत रेशन देणे, १२ कोटी घरांत पिण्याचे पाणी पोहोचविणे, स्वयंपाकाचा गॅस प्रत्येक घरी पोहोचविणे, ५० कोटींपेक्षा जास्त बँक खाती उघडणे, मनरेगाला डीबीटीशी जोडणे, पीक विमा योजनेची व्याप्ती वाढविणे यांसारख्या योजनांचा यात समावेश आहे. मोदी सरकारच्या मंत्रालयाच्या योजना व कामांचाही यात समावेश केला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी