शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

'या' ठिकाणी मिळतंय देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल, डिझेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 13:47 IST

फक्त सहा टक्के व्हॅट लागत असल्यानं इंधन स्वस्त

मुंबई: देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलच्या दरानं 80 रुपयांचा टप्पा ओलांडलाय. मुंबईत तर आज पेट्रोल प्रति लिटर 86.24 रुपयांवर जाऊन पोहोचलंय. जयपूर, कोलकाता, श्रीनगर, भोपाळ या शहरांमध्येही पेट्रोलचे दर वाढल्यानं सामान्य जनता त्रस्त झालीय. मात्र अंदमान आणि निकोबार बेटांवर पेट्रोल 67.55 प्रति लिटर रुपयांना मिळतंय. तर डिझेलसाठी 64.80 रुपये मोजावे लागताहेत. संपूर्ण देशात इतकं स्वस्त पेट्रोल आणि डिझेल इतर कुठेही मिळत नाहीय.देशातील राज्यं पेट्रोल, डिझेलवर मोठ्या प्रमाणात व्हॅट लावतात. त्यामुळे इंधन दरात मोठी वाढ होते. मात्र अंदमान निरोबारमध्ये पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट फक्त 6 टक्के इतका आहे. त्यामुळेच या ठिकाणी पेट्रोल, डिझेल स्वस्त मिळतं. स्वस्त इंधन दराचा विचार केल्यास अंदमान निकोबारनंतर गोव्याचा क्रमांक लागतो. गोव्यात पेट्रोल, डिझेलवर 16.62 टक्के व्हॅट आहे. त्यामुळे आज गोव्यात पेट्रोलचा दर 72.31 रुपये इतका आहे. तर डिझेलसाठी गोव्यात 70.58 रुपये मोजावे लागत आहेत. देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मुंबईत मिळतंय. आज मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 86.24 रुपये इतका आहे. राज्य सरकारनं पेट्रोलवर तब्बल 39.78 टक्के व्हॅट लावला आहे. सध्या आसाम, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, केरळ, जम्मू कश्मीर, आंध्र प्रदेश, पंजाब, बिहार आणि मध्य प्रदेशात पेट्रोलचा दर 80 रुपयांहून अधिक आहे.  

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलCrude Oilखनिज तेल