शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कंपन्यांचे पेट्राेल स्वस्त; सरकारी कंपन्या कधी करणार दरकपात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 06:03 IST

रिलायन्स बीपी, नायरा एनर्जी आणि शेल या कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीनुसार इंधन विक्री सुरू केली आहे.

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी हाेऊ लागल्यानंतर पेट्राेल आणि डिझेलचे दर घटण्याची शक्यता बळावली आहे. खासगी क्षेत्राती तेल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारानुसार पुन्हा पेट्राेल व डिझेलची विक्री सुरू केली आहे. सरकारी तेल कंपन्यांपेक्षा एक रुपया कमी किमतीने येथे पेट्राेल विकण्यात येत आहे, याचे अनुकरण सरकारी तेल कंपन्या करू शकतात. तसे झाल्यास पेट्राेल व डिझेलचे दर घटू शकतात.

रिलायन्स बीपी, नायरा एनर्जी आणि शेल या कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीनुसार इंधन विक्री सुरू केली आहे. वर्षभरानंतर प्रथमच इंधनची किंमत बाजाराशी जाेडण्यात आली आहे. गेल्या वर्षी इंधनाच्या किमती भडकल्या हाेत्या. त्यावेळी या कंपन्यांनी सरकारी तेल कंपन्यांपेक्षा काही प्रमाणात जास्त दराने इंधनविक्री केली. गेल्या वर्षी नाेव्हेंबर महिन्यापासून देशात पेट्राेल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.  

रशियाकडून मिळणारी सवलत चीनने ओढलीरशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्यामध्ये भारताला चीनच्या कंपन्या जाेरदार स्पर्धा करत आहेत. १६.३१ लाख बॅरल्स कच्चे तेल रशियाकडून भारताने एप्रिलमध्ये दरराेज आयात केले. १९.१ लाख बॅरेल्स एवढी कच्च्या तेलाची आयात चीनने फेब्रुवारी आणि मार्चमध्ये दरराेज केली. १५ ते २० डाॅलर्स एवढी सवलत भारताला मिळत हाेती. ती आता सरासरी आठ डाॅलर्स एवढीच मिळत आहे.

तेल कंपन्या नफ्यातपेट्राेल-डिझेल विक्रीतून सरकारी तेल कंपन्या गेल्या महिन्यात अनुक्रमे ८.७ आणि ११.१ रुपये प्रति लिटर एवढा सरासरी नफा कमवित हाेत्या. ताेट्यात असूनही किमती स्थिर ठेवल्यामुळे सरकारने तेल कंपन्यांना अनुदानही दिले आहे. 

युक्रेन युद्धानंतर वाढले इंधनदरयुक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षी कच्च्या तेलाचे दर १४० डाॅलर्स प्रतिबॅरलवर गेले हाेते. त्यावेळी देशात पेट्राेल व डिझेल दर उच्चांकी पातळीवर पाेहाेचले. त्यानंतर केंद्राने उत्पादन शुल्क तर बहुतांश राज्यांनी व्हॅट कमी करून जनतेला दिलासा दिला. 

साैदी अरब व ओपेक देशांनी मे महिन्यापासून कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कच्चे तेल पुन्हा महाग हाेण्याची शक्यता आहे. कपातीचा निर्णय जाहीर केला हाेता, त्यावेळी कच्च्या तेलाचे दर ८५ डाॅलर्स प्रति बॅरेलपर्यंत वाढले हाेते. नंतर घसरण झाली आहे.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंप