शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

एकदम मस्त, टीव्ही पाहणे होणार स्वस्त; 200 वाहिन्यांसाठी मोजावी लागणार केवळ 'इतकी' रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 3:40 AM

१ मार्चपासून अंमलबजावणी होणार

मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने (ट्राय) जारी केलेल्या नवीन नियमावलीनुसार १३० रुपयांत २०० वाहिन्या पाहता येतील तर सर्व नि:शुल्क वाहिन्यांसाठी एनसीएफ (कमाल नेटवर्क कॅपॅसिटी फी) १६० रुपये इतकी ठरविली आहे. यामुळे सध्याच्या तुलनेत टीव्ही पाहणे अधिक स्वस्त होईल, असा दावा ट्रायने केला आहे. १ मार्चपासून या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.ट्रायने मार्च २०१७ मध्ये जारी केलेली नियमावली २९ डिसेंबर २०१८ पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात आली होती. याबाबत ग्राहकांकडून शुल्कासंदर्भात तक्रारी आल्यानंतर ट्रायने १६ ऑगस्टला कन्सल्टेशन पेपर जाहीर केला होता. त्यामध्ये आलेल्या तक्रारी, सूचनांचा अभ्यास करून ट्रायने नवीन नियमावली जारी केली.नवीन नियमावलीनुसार, वाहिन्यांच्या समूहामध्ये समाविष्ट असलेल्या सशुल्क वाहिनीच्या किमतीच्या दीड पटीपेक्षा जास्त एकूण समूहाची किंमत असू नये, समूहात समाविष्ट सशुल्क वाहिन्यांच्या सरासरी किमतीच्या तिप्पट किंमत एकूण समूहाची असू नये. ब्रॉडकास्टर्सद्वारे ग्राहकांना देण्यात येणाऱ्या समूह वाहिन्यांच्या पर्यायांमध्ये ज्या सशुल्क वाहिन्यांची किंमत १२ रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे त्याच वाहिन्यांचा समावेश करता येईल. नेटवर्क कॅपॅसिटी शुल्क म्हणून पहिल्या २०० वाहिन्यांसाठी १३० रुपये व २०० पेक्षा जास्त वाहिन्यांसाठी कमाल १६० रुपये शुल्क आकारावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारने जाहीर केलेल्या बंधनकारक वाहिन्यांचा समावेश या एनसीएफच्या वाहिन्यांच्या यादीत करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.दुसºया टीव्हीसाठी ४०% शुल्कएकाच घरात एकापेक्षा अधिक टीव्ही असल्यास प्रत्येक टीव्हीसाठी आतापर्यंत १३० रुपये एनसीएफ शुल्क आकारले जात होते. याऐवजी आता दुसºया टीव्हीसाठी व त्यापुढील टीव्हीसाठी एनसीएफच्या कमाल ४० टक्के शुल्क आकारले जावे, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती ट्रायचे अरविंद कुमार यांनी दिली. ब्रॉडकास्टर्सनी नवीन दरपत्रक व समूह वाहिन्यांची माहिती १५ जानेवारीपर्यंत संकेतस्थळावर प्रकाशित करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.खातेवाटपापूर्वीच राज्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश!दर्यापूर (अमरावती) : महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, खातेवाटप झालेले नाही. असे असताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कामात हयगय केल्याचा ठपका ठेवत स्थानिक पुरवठा विभागातील दोन अधिकाºयांच्या निलंबनाचे आदेश दिल्याने कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली आहे.फडणवीस सरकारमधील भाजप मंत्र्यांकडे असणाºया अधिकाºयांना घेऊ नकामुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील भाजपच्या मंत्र्यांकडे असणारे अधिकारी, खाजगी सचिव, ओएसडी यांना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी आपआपल्या आस्थापनेवर घेऊ नये, अशा सूचना दिल्याचे समजते. भाजप सत्तेवर असताना त्यांनीही असाच निर्णय घेतला होता.

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय