शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
4
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
5
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
6
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
7
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
8
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
10
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
11
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
12
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
13
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
14
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
15
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
16
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
17
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
20
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?

स्वस्त ‘स्मार्टफोन’ बाजारात

By admin | Updated: February 18, 2016 06:45 IST

एका भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनीने सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘फ्रीडम २५१’ बुधवारी बाजारात आणला. या ‘३-जी’ स्मार्टफोनची किंमत केवळ २५१ रुपये आहे.

नवी दिल्ली : एका भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनीने सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘फ्रीडम २५१’ बुधवारी बाजारात आणला. या ‘३-जी’ स्मार्टफोनची किंमत केवळ २५१ रुपये आहे. वेगाने वाढणाऱ्या भारतीय मोबाईल हॅण्डसेट बाजारात हा स्मार्टफोन धुमाकूळ घालू शकतो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फ्रीडम २५१ चा ४ इंचाचा क्यूएचडी डिसप्ले असून ९६० इनटू ५४० एवढे पिक्सल रिजोल्युशन आहे. याशिवाय क्वालकाम १.३ गीगाहर्टज् क्वाड-कोर प्रोसेसर आणि एक जीबीची रॅम असेल. अ‍ॅण्ड्रॉईड ५.१ लॉलीपॉप आॅपरेटिंग सिस्टीमवर आधारित या हॅण्डसेटमध्ये ८ जीबीची इंटरनल स्टोरेज सुविधा असून मायक्रो एसडी कार्ड वापरून ती ३२ जीबीपर्यंत वाढविता येऊ शकेल. यात ३.२ मेगापिक्सलचा रियर आणि ०.३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. त्याचबरोबर १,४५० एमएएचची बॅटरी त्याला इंधन पुरवेल. या फोनमध्ये वूमेन सेफ्टी, स्वच्छ भारत, फिशरमॅन, फार्मर, मेडिकल, व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक आणि यू ट्यूबसह अनेक अ‍ॅप्स इनबिल्ट असतील. फ्रीडम- २५१ साठी उद्यापासून (ता. १८) बुकिंग सुरू होईल. यापूर्वी कंपनीने सर्वात स्वस्त ४-जी स्मार्टफोन २,९९९ रुपयांत बाजारात उतरविला होता. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते राजधानी नवी दिल्लीत सायंकाळी फ्रीडम २५१ चे अनावरण झाले. हा फोन पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे. पैशांअभावी स्मार्टफोन वापरू न शकणाऱ्यांचे हे स्वप्न फ्रीडम २५१ साकारेल हे निश्चित.