शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

"कलम 370  परत आणा", जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपी आमदाराचा प्रस्ताव, मोठा गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 13:26 IST

J&K Assembly session : विधानसभेत मांडलेल्या या प्रस्तावाच्या निषेधार्थ भाजप आमदारांनीही गदारोळ केला. 

जम्मू-काश्मीर : पीडीपीचे आमदार वाहिद पारा यांनी सोमवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम 370 हटविण्यात आल्यामुळे विरोध करणारा ठराव मांडला. याशिवाय जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा बहाल करण्याचीही मागणी करण्यात आली. दरम्यान, विधानसभेत मांडलेल्या या प्रस्तावाच्या निषेधार्थ भाजप आमदारांनीही गदारोळ केला. 

जम्मू-काश्मीरला पुन्हा विशेष दर्जा मिळाला पाहिजे आणि कलम 370 पुन्हा बहाल केले जावे, असे पीडीपीचे आमदार वाहिद पारा म्हणाले. तसेच, जम्मू-काश्मीरला पुन्हा पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणीही त्यांनी केली. सध्या जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश आहे. याठिकाणी दिल्लीसारखी विधानसभा आहे.

पुलवामाचे पीडीपी आमदार वाहिद पारा यांच्या या प्रस्तावाविरोधात सभागृहात भाजपचे सर्व २८ आमदार आपापल्या जागेवर उभे राहिले आणि त्यांनी जोरदार विरोध करत गदारोळ घातला. भाजप आमदार शामलाल शर्मा यांनी तर वहीद पारा यांनी असा प्रस्ताव आणून सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. 

यावेळी विधानसभा अध्यक्ष अब्दुल रहीम राठर हे सर्व आमदारांनी आपापल्या जागेवर बसावे, असे वारंवार आवाहन करत होते, मात्र त्यांचे कोणीही ऐकले नाही. दरम्यान, हा प्रस्ताव अद्याप माझ्याकडे आलेला नाही. तो वाचूनच कोणताही निर्णय घेतला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष अब्दुल रहीम राठर यांनी सांगितले.

भाजपचे आमदार गोंधळ घालत असतानाच नॅशनल कॉन्फरन्सचे आमदारही वेलमध्ये आले. ते म्हणाले की, भाजपचे लोक कामकाजात अडथळा आणत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय, त्याच दिवशी राज्याच्या पुनर्रचनेचा प्रस्तावही संसदेत मांडण्यात आला आणि जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला होत. तर लडाखही वेगळे करण्यात आले होते.

अब्दुल रहीम राठर यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड!दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते आणि सात वेळा आमदार अब्दुल रहीम राठर यांची जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. विरोधी पक्षांनी या पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने आवाजी मतदानाने अब्दुल रहीम राठर यांची अध्यक्षपदी निवड झाली. ‘प्रोटेम स्पीकर’ मुबारक गुल यांनी निवडणूक घेतली. पाच दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कृषी मंत्री जावेद अहमद दार यांनी अब्दुल रहीम राठर यांना अध्यक्षपदासाठी नामनिर्देशित करण्याचा प्रस्ताव मांडला आणिनॅशनल कॉन्फरन्स आमदार रामबन अर्जुनसिंग राजू यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPDPपीडीपीArticle 370कलम 370