शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सफर्डमध्ये ममता बॅनर्जींच्या भाषणादरम्यान गोंधळ; निदर्शकांना दिलं जोरदार प्रत्त्युत्तर, म्हणाल्या- आपल्याला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 10:06 IST

"आपणच वारंवार मला येथे येण्यासाठी प्रोत्साहित केले. लक्षात असू द्या, दिदी कुणाचीही परवा करत नाही. दीदी रॉयल बंगाल टायगरसारखी चालते. जर तुम्ही मला पकडू शकत असाल, तर पकडा!"

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी (27 मार्च) लंडनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या केलॉग कॉलेजमध्ये भाषण दिले. यावेळी त्यांच्या भाषणादरम्यान काही विद्यार्थ्यांनी निदर्शन केले. या विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत आरजी कर कॉलेज आणि घोटाळ्यांशी संबंधित मुद्दे उपस्थित केले. मात्र, मुख्यमंत्री ममता यांनी परिस्थिती सांभाळत निदर्शकांना उत्तर दिले.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना या महाविद्यालयात महिला, मुले आणि समाजातील उपेक्षित घटकांच्या सामाजिक विकासावर बोलण्यासाठी बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांनी बंगालमधील 'स्वास्थ्य साथी' आणि 'कन्याश्री' योजनांचाही संदर्भ दिला. यानंतर, त्यांनी बंगालमधील गुंतवणुकीवर बोलायला सुरुवात करताच, काही लोक हातात फलक घेऊन उभे राहिले. यावर, राज्यातील निवडणुका आणि हिंसाचार तसेच आरजी करचा मुद्दा होता. यावेळी निदर्शकांनी घोषणाबाजीही केली. यावर, मुख्यमंत्र्यांनी मोजक्या शब्दांत उत्तर देत निदर्शकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. निदर्शकांना उद्देशून मुख्यमंत्री ममता म्हणाल्या, "आपण माझे स्वागत करत आहात, धन्यवाद. मी आपल्याला मिठाई देईन."

माझा अपमान करून आपल्या संस्थेचा अपमान करू नका -प्रदर्शन करणाऱ्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री ममता म्हणाल्या, "माझा अपमान करून आपल्या संस्थेचा अपमान करू नका. मी देशाची प्रतिनिधी म्हणून आली आहे. आपल्या देशाचा अपमान करू नका." यानंतर, कार्यक्रमाचे आयोजक आणि तेथे उपस्थित लोक निदर्शकांविरोधात उभे राहिले आणि त्यांना तेथून जाण्यास भाग पाडले.

"रॉयल बंगाल टायगर प्रमाणे चालते दिदी" -दरम्यान मुख्यमंत्री शांततेत म्हणाल्या, "आपणच वारंवार मला येथे येण्यासाठी प्रोत्साहित केले. लक्षात असू द्या, दिदी कुणाचीही परवा करत नाही. दीदी रॉयल बंगाल टायगरसारखी चालते. जर तुम्ही मला पकडू शकत असाल, तर पकडा!" यानंतर तृणमूल काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट करत, "त्या (ममता बनर्जी) झुकत नाहीत. त्या डगमगत नाहीत, आपण त्यांना जेवढे अधिक टोकाल, त्या तेवढीच भयंकर गर्जना करतील. ममता बॅनर्जी एक रॉयल बंगाल टायगर आहेत."

आरजी कर प्रकरणावर काय म्हणाल्या ममता? - निदर्शकांनी उपस्थित केलेल्या आरजी कराच्या मुद्द्याला प्रत्युत्तर देताना ममता म्हणाल्या, "थोडे मोठ्याने बोला, मला तुमचे बोलणे ऐकू येत नाही. मी आपले सर्व म्हणणे ऐकेन. हे प्रकरण प्रलंबित आहे, हे आपल्याला माहीत आहे का? या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी आता केंद्र सरकारची आहे. हे प्रकरण आता आमच्या हातात नाही. येथे राजकारण करू नका, हे राजकारणाचे व्यासपीठ नाही. माझ्या राज्यात जा आणि माझ्यासोबत राजकारण करा."

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीLondonलंडनEnglandइंग्लंडTrinamool Congressतृणमूल काँग्रेस