शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

परकीय मदतीबाबतच्या धोरणात बदल; स्वीकारणार विदेशी देणग्या, चीनकडून खरेदीस मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 06:30 IST

स्वीकारणार विदेशी देणग्या : चीनकडून खरेदीस मान्यता

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकामुळे भारत सरकारने विदेशी मदत स्वीकारण्याच्या बाबतीतील धोरणात पूर्णत: बदल करून १६ वर्षांत प्रथमच विदेशी देशांकडून भेटवस्तू, देणग्या आणि मदत स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे, तर चीनकडूनही आवश्यक साहित्य खरेदीस भारत सरकारने अनुमती दिली आहे. 

कोविड-१९ च्या उद्रेकामुळे भारतात ऑक्सिजन, औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारला विदेशी मदतीबाबतच्या धोरणात संपूर्ण बदल करावा लागला आहे. उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, सीमेवरील तणावानंतर चिनी आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला होता. कोरोना उद्रेकामुळे या धोरणात आता बदल करण्यात आला आहे. चीनमधून ऑक्सिजनशी संबंधित उपकरणे आणि जीवनरक्षक औषधे यांची आयात केल्यास सरकारला आता कोणतीही अडचण राहणार नाही. 

पाकिस्तानकडून मदत स्वीकारण्याबाबत मात्र अजून कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. पाकिस्तानची मदत स्वीकारली जाण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले. खासगी संस्थांनी विदेशातून जीवनरक्षक उपकरणे व औषधे आयात केल्यास सरकारमध्ये येणार नाही. डिसेंबर २००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी विदेशी मदत घेण्याचे नाकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २०१३ चा उत्तराखंड पूर, २००५ चा काश्मीर भूकंप आणि २०१४ चा काश्मीर पूर, अशा अनेक आपत्तींवर भारताने स्वबळावर यशस्वी मात केली. २०१८ मध्ये केरळात पूर आला तेव्हा संयुक्त अरब आमिरातीने देऊ केलेली ७०० कोटी रुपयांची मदत स्वीकारण्याची परवानगी मोदी  सरकारने केरळला नाकारली होती.

स्वयंपूर्णतेसाठी...

१६ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान मनमाेहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकारने देशाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी विदेशी मदत न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधी अनेक आपत्तींमध्ये भारताने विदेशी मदत स्वीकारली होती. त्यात उत्तरकाशी भूकंप (१९९१), लातूर भूकंप (१९९३), गुजरात भूकंप (२००१), बंगाल चक्रीवादळ (२००२), बिहार पूर (जुलै २००४) या आपत्तींचा समावेश आहे.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन