शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

'चांद्रयान-2'च्या लँडिंगवरून ममता बॅनर्जींचा मोदी सरकारवर निशाणा; 'दीदीं'ना वेगळाच संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 17:49 IST

'चांद्रयान-2'च्या लँडिंगवरून ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे.

कोलकाता: भारताचे महत्वाकांक्षी चांद्रयान- 2 अखेर चंद्राच्या जवळ पोहचले असून शनिवारी  (7 सप्टेंबर) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून हे इतिहास रचणार आहे. मात्र 'चांद्रयान-2'च्या लँडिंगवरून ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे.

 'चांद्रयान-2'च्या लँडिंग होण्यास काही तास बाकी असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (शुक्रवारी) मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मोदी सरकार  चांद्रयान- 2 मिशनची अशी जाहीरात करत आहेत जसे यापूर्वी भारताने कोणतीही आंतराळ मोहीम केली नाही. देशात आर्थिक मंदीचे उभे राहीलेले संकट लपविण्यासाठी केंद्र सरकार चांद्रयान-2चा वापर करत असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे. 

तसेच आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचारप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेवर बोलताना न्यायव्यवस्था आपले काम करेलच, परंतु भाजपा सरकारने चिदंबरम यांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी होती असे मत त्यांनी कोलकात्तामध्ये एका भाषणात मांडले आहे.

भारताच्या इतिहासात आजची मध्यरात्र सुवर्णक्षरांनी लिहिली जाणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रोनं पाठवलेलं 'चांद्रयान-2' आज मध्यरात्री १.३० ते २.३०च्या सुमारास चंद्रावर लँड होणार आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नागरिकांना हा अनुपम्य सोहळा पाहण्याचं आवाहन केलंय. चांद्रयानाचं लँडिंग पाहतानाच फोटो सोशल मीडियावर पोस्ट करा, मी त्यातले काही रिट्विट करेन, असंही त्यांनी जाहीर केलंय.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीisroइस्रो