शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
4
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
5
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
6
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
7
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
8
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
9
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
10
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
11
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
12
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
13
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
14
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
15
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
16
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
17
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
18
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
19
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
20
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
Daily Top 2Weekly Top 5

Chandrayaan-2 : गुड न्यूज! हार्ड लँडिगनंतरही विक्रम लँडर सुस्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 15:34 IST

इस्रोची चांद्रयान-2 मोहीम पूर्णपणे यशस्वी होण्याची आशा अद्यापही कायम आहे. चांद्रयान -2 संदर्भात आता एक आनंदाची बातमी आहे.

ठळक मुद्देचांद्रयान -2 संदर्भात आता एक आनंदाची बातमी आहे. विक्रम लँडर नियोजित जागेच्या जवळ आहे. त्याचं नुकसान झालेलं नाही. विक्रम तुटलेलं नाही आणि ते सुरक्षित आहे.

बंगळुरू - इस्रोचीचांद्रयान-2 मोहीम पूर्णपणे यशस्वी होण्याची आशा अद्यापही कायम आहे. चांद्रयान -2 संदर्भात आता एक आनंदाची बातमी आहे. विक्रम लँडर नियोजित जागेच्या जवळ आहे. त्याचं नुकसान झालेलं नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर ते थोडं तिरकं आहे अशी माहिती चांद्रयान मिशनशी संबंधित असणाऱ्या इस्रोच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. अधिकाऱ्याने सोमवारी (9 सप्टेंबर) दिलेल्या माहितीनुसार, 'विक्रमने हार्ड लँडिंग केलं आहे आणि ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने जे छायाचित्र पाठवलं आहे, त्यानुसार विक्रम नियोजित स्थळाजवळ आहे. विक्रम तुटलेलं नाही आणि ते सुरक्षित आहे.'

इस्रोच्या आणखी एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर विक्रम लँडरचा एक जरी भाग निकामी झाला असेल तरी संपर्क साधणं कठीण होईल. पण आतापर्यंतची स्थिती चांगली आहे. चंद्रापासून 2.1 किलोमीटर अंतरावर गेल्यावर लँडर विक्रमशी तुटलेला संपर्क पुन्हा प्रस्थापित केला जाऊ शकतो. विक्रमचं सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरलं असलं, तरीही ते स्वत:च्या पायावर उभं राहू शकतं. इस्रोला विक्रमशी संपर्क साधण्यात यश आल्यास भारताच्या नावावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद होईल.

चांद्रयान-2 च्या लँडर विक्रममध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्याची माहिती इस्रोतील विश्वसनीय सूत्रांनी दिली. या तंत्रज्ञानामुळे विक्रम लँडर स्वत:हून उभं राहू शकतं. मात्र त्यासाठी प्रथम विक्रमशी संपर्क प्रस्थापित व्हायला हवा. विक्रमशी संपर्क साधण्यात यश आल्यास त्याला इस्रोकडून सूचना पाठवल्या जाऊ शकतात. त्यानंतर विक्रम स्वत:हून चंद्राच्या पृष्ठभागावर उभं राहू शकेल.

लँडर विक्रममध्ये ऑनबोर्ड कॉम्प्युटर आहे. त्यामुळे विक्रम अनेक काम स्वत:हून करतं. विक्रमचं सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्यानं त्याचा अँटिना दबला आहे. त्यामुळे त्याच्याशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. या अँटिनाच्या माध्यमातून संपर्क साधण्यासाठी इस्रोचे प्रयत्न सुरू आहेत. यात यश आल्यास विक्रमला सूचना पाठवल्या जाऊ शकतील. त्यामुळे विक्रम स्वत:च्या पायावर उभं राहू शकेल. 

विक्रममध्ये कोणतं तंत्रज्ञान? ते कसं काम करतं?

इस्रोतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडर विक्रमच्या खालील भागात पाच थ्रस्टर्स आहेत. याच थ्रस्टर्सच्या मदतीनं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं जाणार होतं. याशिवाय इस्रोच्या चारही बाजूंना थ्रस्टर्स आहेत. याच थ्रस्टर्सनी अंतराळात विक्रमला दिशा देण्याचं काम केलं. हे चारही थ्रस्टर्स अद्याप सुरक्षित आहेत. सध्या लँडरवरील कम्युनिकेशन अँटिना दबलेल्या अवस्थेत आहे. त्याही भागात थ्रस्टर्स आहेत. इस्रोच्या ग्राऊंड स्टेशनवरुन पाठवण्यात आलेल्या सूचना ऑर्बिटरच्या माध्यमातून अँटिनापर्यंत पोहोचल्यास थ्रस्टर्स ऑन होऊ शकतात. त्यानंतर विक्रम स्वत:च्या पायावर उभं राहू शकेल. इस्रो यामध्ये यशस्वी ठरल्यास चांद्रयान-2 मोहिमेसंदर्भातील सर्व प्रयोग ठरल्याप्रमाणे करणं शक्य होईल. यामुळे इस्रोच्या नावावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद होईल. चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणारा पहिला देश होण्याचा मान यामुळे भारताला मिळेल.

 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रोIndiaभारत